नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ; सहा उमेदवारांची निवडणुकीतून माघार, 16 उमेदवार रिंगणात

सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील


सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील लढत रंगणार

युवावर्ता (प्रतिनिधी)

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.
अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धंजनय क्रिष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदार संघ निवणुकीतून माघार घेतली आहे.


रतन कचरु बनसोडे, नाशिक वंचित बहुजन आघाडी, सुरेश भिमराव पवार, नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, अनिल शांताराम तेजा, अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, धुळे अपक्ष, अविनाश महादू माळी, नंदूरबार अपक्ष, इरफान मो असहाक, मालेगाव जि.नाशिक अपक्ष, ईश्वर उखा पाटील,धुळे अपक्ष, बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक, अपक्ष, ॲड. जुबेर नासिर शेख,धुळे अपक्ष, ॲड.सुभाष राजाराम जंगले, श्रीरामपुर, अपक्ष, सत्यजित सुधीर तांबे,संगमनेर, अपक्ष, नितीन नारायण सरोदे, नाशिक अपक्ष, पोपट सिताराम बनकर, अहमदनगर, अपक्ष, शुभांगी भास्कर पाटील,धुळे अपक्ष, सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर, अपक्ष, संजय एकनाथ माळी,जळगाव,अपक्ष असे एकूण 16 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.

ऐनवेळी घडलेल्या राजकीय नाट्यामुळे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पुरस्कृत केले आणि सत्यजित तांबे काॅंग्रेस पक्षाचे निष्ठावंत असूनही त्यांना भाजपचा पाठिंबा घ्यावा लागला. यामुळे सत्यजित तांबे अपक्ष म्हणून सहज निवडून येतील अशी सर्वांनाच खात्री होती परंतु आता सत्यजित तांबे व शिवसेना पुरस्कृत महाआघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे दरम्यान सत्यजित साठी भाजपाने दबाव वापरून धनंजय जाधव व नाशिकचे विसपुते यांचे अर्ज माघारी घेतले. शुभांगी पाटील यांच्यावर देखील दबाव वाढला होता त्यामुळे त्या आज सकाळपासून नाॅट रिचेबल झाल्या होत्या. त्यामुळे एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख