मुळगंगा मातेच्या यात्रा उत्सवास गुरुवारपासून प्रारंभ

युवावार्ता (संगमनेर प्रतिनिधी)
तालुक्यातील चंदनापुरी येथील जागृत देवस्थान श्री मुळगंगा मातेच्या यात्रा उत्सवास गुरुवार दिनांक 23 मार्च पासून प्रारंभ होत आहे. या उत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. नवसाला पावणारी श्री मुळगंगा माता अशी ख्याती असलेल्या या देवस्थानात राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. गुरुवारी सकाळी 8 वाजता होम हवन करून देवीची महाआरती होणार आहे. दिवसभरात देवीला नैवेद्य, नारळ, पेढा, ओटी भरण, गुळाची शेरनी, असा प्रसाद चढविला जातो. ज्या भाविक भक्तांनी वर्षभरात केलेला नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात, रात्री 8 वाजता छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून फटाक्यांची आतीश बाजिने मिरवणुकीचे स्वागत करण्यात येणार आहे.

सनई चौघडा या पारंपारिक वाद्य पद्धतीने निघालेला मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. त्यानंतर मारुतीच्या मंदिरासमोर फटाक्याची आतिषबाजी होऊन मिरवणुकीची सांगता होणार आहे. त्यानंतर रात्री 10 वाजता सुप्रसिद्ध कै. तुकाराम खेडकर सह पाडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता हजेरीचा कार्यक्रम होईल तर सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे. तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटी व मुळगंगा देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रा उत्सवानिमित्ताने मुळगंगा मातेच्या मंदिरासह गावातील सर्व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. दरम्यान यावर्षीचे यात्रेचे मुख्य आकर्षण सर्वांसाठी सर्वात उंच पाळणा, ब्रेक डान्स, लहान मुलांसाठी, बलून, रेल्वे, मोटार गाडी, अशा विविध नाविन्य खेळ आयोजित केला आहे. त्यामुळे या सर्व गोड कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी आनंद घ्यावा असे आव्हान चंदनपुरी ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख