खासदार लोखंडे शिंदे गटात ; पक्षातून गद्दार खासदार गेले- कतारी ; संगमनेर शिवसेनेकडून ढोल ताशा वाजवून पेढे वाटप

संगमनेर (प्रतिनिधी)
शिवसेनेच्या तिकीटावर व शिवसैनिकांच्या मेहतीवर निवडून जाऊनही खासदार सदाशिव लोखंडे यांनी गद्दारी करत शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेशी केलेल्या या गद्दारीमुळे सदाशिव लोखंडे यांचा संगमनेर शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांनी पेढे वाटून व ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. गद्दार लोखंडे मुर्दाबाद, शिवसेना जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच लोखंडेंच्या प्रतिमेला यावेळी काळे फासण्यात आले तसेच खा. लोखंडे यांनी विना सुरक्षा संगमनेरात येऊन दाखवावे त्यांना फटके दिल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही असा इशारा शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिला आहे.

शिवसेनेत असताना खासदार लोखंडेंनी कोणतेही काम केले नाही. त्यांनी कोणत्याही शिवसैनिकांना मदत केली नाही व मतदारसंघात कधी भटकलेच नाही. मतदार संघातल्या लोकांच्या गाठीभेटी कधी घेतल्या नाही, लोकांच्या सुख दुःखात कधीच गेले नाही आणि ते आता गद्दार होऊन शिंदे गटात सामील झाले. याचा निषेध व्यक्त करत व ते निघून गेल्यामुळे शिवसेनेला पोकळी नाही तर त्यांच्या जागी चांगला शिवसैनिक भविष्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडून येईल याचा आनंद शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला. शिवसैनिकांच्या मेहनतीवर लोखंडे शिर्डी मतदार संघात खासदार झाले होते. त्यांना मानणारा एक गटही या मतदार संघात नाही. केवळ पक्षाची ताकद म्हणून त्यांना दोन वेळेस खासदारकीची संधी मिळाली. मात्र त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली.

गद्दार खासदाराचा संगमनेर शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, पंचायत समिती सदस्य अशोकराव सातपुते, कामगार सेना जिल्हाप्रमुख मुजीब भाई शेख, संपर्कप्रमुख नरेश जी माळवे, युवा सेना शहरप्रमुख अमोल डुकरे, उपशहर प्रमुख विकास डमाळे, महिला आघाडीच्या संगीताताई गायकवाड, आशाताई केदारी, सुदर्शन ईटप, अक्षय बिल्लाडे, सचिन साळवे, अक्षय गाडे, वेणुगोपाल लाहोटी, दानिश खान, वैभव अभंग, विजय भागवत, शाखाप्रमुख आजीजभाई मोमीन, राजाभाऊ सातपुते, फैसल सय्यद, दीपक वन्नम, अजित, तौसीफ रंगरेज, असलम रंगरेज, शोएब शेख, माजिद मोमीन, अहमद चौधरी, अक्षय मोरे, मुस्ताक पारवे, मुस्तफा मोमीन यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

शिर्डीत मतदार सेनेचे मात्र खासदार पळतात भाजपात

काँगेस- राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या शिर्डी मतदारसंघावर शिवसेनेने आपली पकड मजबूत केली. सलग पंधरा वर्षापासून शिवसेनेचा खासदार येथून निवडून येतो, परंतु मध्येच शिवसेनेचे खासदार भाजपमध्ये पळुन जात शिवसेनेशी गद्दारी करत आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनीही पक्षाची साथ सोडली. त्यामुळे शिर्डी मतदारसंघ पुन्हा एकदा नेत्यावाचून पोरका झाला आहे. शिवसैनिक मात्र अजूनही पक्षाची ईमान ठेवून आहे हिच तेव्हढी जमेची बाजू.
शिवसेनेच्या बंडखोर बारा खासदारात लोखंडे यांचाही समावेश झाला आहे. हे बंडखोर आता नाममात्र सेनेत असून भाजपाने त्यांना आता आयते गळाला लावले आहे. यापूर्वी शिवसेनेचे खासदार राहिलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनीही सेनेला जय महाराष्ट्र करत सुरूवातीला काँग्रेस व नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सेना सोडणारे लोखंडे हे उत्तरेतील दुसरे खासदार ठरले आहेत. मात्र या पक्षांतर करणार्‍या वाकचौरेंना मतदारांनी दोन वेळेस पराभूत केले. आता लोखंडेंनीही सेनेचे साथ सोडली असून शिंदे गट व्हाया भाजप असा प्रवास सुरू केला आहे. . पक्षाचा एकूण इतिहास पहाता पक्षाशी बंडखोरी करणारे पुन्हा निवडणून येत नाही. आता लोखंडेंचेे काय होणार हा येणारा काळच ठरवणार आहे.
नेत्यांनी पक्षांतर केले असले तरी शिर्डी मतदार संघातील पदाधिकारी व शिवसैनिक अजूनही पक्षातच आहे. सेनेले माणनारे मतदारही कायम आहे. शिर्डी मतदार संघ शिवसेनेला लकी ठरला असला तरी खासदार मात्र लकी मिळत नाही हे येथील शिवसेनेचे दुर्देव आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख