लायन्स संगमनेर सफायरचा स्तुत्य उपक्रम
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – लायन्स क्लब संगमनेर सफायर आयोजित शाडू माती श्रीगणेश मूर्ती रंगभरण स्पर्धा मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये 5 वी ते 6 वी तसेच 7 वी ते 10 वी अशा दोन गटांनुसार स्पर्धा झाली. यामध्ये संगमनेरमधील सर्वच शाळेतील विद्यार्थांनी आपला सहभाग नोंदवला. नैसर्गिक मातीची शास्त्रशुध्द मूर्ती हाताने रंगवून विद्यार्थ्यांना ही मूर्ती भेट देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आपआपल्या घरी भक्तिभावाने श्रीगणेशाची स्थापना केली.
लायन्स क्लब संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीष मालपाणी, मा. अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, देविदास गोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संगमनेर सफायरचे अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा, प्रकल्प प्रमुख कल्याण कासट, प्रशांत गुंजाळ, सुदीप हासे हे उपस्थित होते. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून संजय मासाळ व विश्वनाथ गाडेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
पीओपी गणपती विसर्जनाने पर्यावरणाची हानी होते. दरवर्षी लायन्स संगमनेर सफायर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि येणार्या पिढीला पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी या शाडू माती श्रीगणेश मूर्ती रंगभरण प्रकल्पाचे आयोजन करते. यंदा या प्रकल्पाचे हे अकरावे वर्ष होते. श्रीगणेश मूर्ती रंगविताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर विलक्षण आनंद होता. सोबत असलेले पालक आणि शिक्षक त्यांना प्रोत्साहन देत होते. दोन्ही गट मिळून एकूण आठ पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. रंगभरण पूर्ण झाल्यानंतर झालेल्या खाऊ वाटपामुळे विद्यार्थी अधिक आनंदित झाले.
प्रकल्प समितीमधील नम्रता अभंग, सुनिता मालपाणी, पूजा कासट, पुष्पा गोरे, प्रिती काळे, मयुरा सारस्वत, उमेश कासट, आर. आर. मालपाणी, रोहित मणियार, डॉ. अमोल वालझाडे, डॉ. नैमिश सराफ, संतोष अभंग, नामदेव मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले