संगमनेरात केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात

0
1467

गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत व आनंदात साजरा करावे – वाघचौरे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सध्या सुरू असलेला गणेशोत्सव व आगामी ईद-ए-मिलाद हे दोन्ही उत्सवात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. या सणाच्या पार्श्वभुमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज बुधवारी शहरातील संवेदनशील भागातून पोलीस, केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल, होमगार्डच्या पथकाने रूटमार्च केला. यावेळी केंद्रीय राखील दलाची एक तुकडी संपूर्ण उत्सव काळात शहरात तळ ठोकून असणार आहे. जवळपास 200 पेक्षा अधिक सुरक्षा जवान या संपूर्ण उत्सवात सतर्क राहणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनात वाघचौरे यांनी दिली.


गेल्या काही दिवसांपासून विविध कारणावरून सामाजिक तेढ वाढतांना दिसत आहे. विविध समाजाचे मोर्चे, आंदोलने, हिंसाचार अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे या महत्वाच्या सणांमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीआरपी (102), उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांसह 6 वरिष्ठ अधिकारी, एसआरपीचे 30 जवान, होमगार्ड 30, हत्यारबंद टिम असा संपूर्ण फौजफाटा शहरातील संवेदनशील ठिकाणावर लक्ष ठेवणार आहे. दरम्यान आज या रूटमार्च नंतर सीआरपीच्या अधिकार्‍यांनी जमाव अक्रमक झाला किंवा तनाव निर्माण झाला तर परिस्थिती कशी हताळयाची, शस्त्रांचा योग्य वापर कसा करायचा याबाबतची माहिती पोलीस व इतर कर्मचार्‍यांना दिली. यावेळी बोलतांना सीआरपीचे प्रमुख म्हणाले की, संपूर्ण उत्सव काळात आम्ही शहरातील संवेदनशील भागात लक्ष ठेवणार आहोत. प्रत्येक संशयास्पद हलचालींवर लक्ष असणार आहे. शहराची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आम्ही सध्या काम करत आहोत. तर उप. पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पोलीसांचा बंदोबस्त व नागरीकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सुचना केल्या. नागरीकांनी गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत व आनंदात साजरा करावे असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here