सरकारकडून मागण्या मान्य
मनोज जरांगेच्या लढाईला अखेर यश आले आहे. सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आले आहेत. सरकारने मध्यरात्रीच या संदर्भातील अध्यादेश काढल्याची माहिती आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता जरांगे यांची भेट आता घेणार आहेत. त्यानंतर जरांगे उपोषण सोडणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश काढल्याची माहिती आहे. तो अध्यादेश जरांगे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात काल रात्री उशीरा बैठक झाली. या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे देखील उपस्थित होते.
मनोज जरांगेच्या यांनी संध्याकाळी भाषणात नमूद केलं होतं की, “आजच्या आज अध्यादेश नाही निघाला तर मग मराठा बांधव उद्या मुंबईला येतील. जर अध्यादेश मिळाला आणि तो योग्य असला तर ते गुलाल उधळायला मुंबईला येणार, असं देखील त्यांनी स्पष्ट केले होते. यामुळे जरांगे पाटील आज मुंबईत गुलाल उधळायला येणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले असून, आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. आज सकाळी शिवाजी महाराज चौक, वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्या उपस्थित आपली विजयी सभा होत आहे.