राजस्थान युवक मंडळाच्या अध्यक्षपदी मनीष मालपाणी

0
1521
malpani navandar

कार्याध्यक्षपदी सम्राट भंडारी तर उपाध्यक्षपदी सुदर्शन नावंदर यांची निवड

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सामाजिक क्षेत्रात वेगळा दबदबा असलेल्या व विविध लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून संगमनेरकरांच्या मनात स्थान निर्माण करणार्‍या राजस्थान युवक मंडळाच्या अध्यक्षपदी उद्योजक मनीष मालपाणी यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी वर्षासाठी पदाधिकार्‍यांची निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यात अध्यक्षपदाची धूरा मालपाणी यांच्याकडे कायम ठेवून उर्वरीत पदाधिकार्‍यांची एकमुखाने निवड करण्यात आली.


संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्राला विस्तृत करणारा, राज्यात नावारुपाला आलेला संगमनेर फेस्टिव्हल, शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी डास निर्मुलन मोहिम, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, हायटेक पद्धतीचा अवलंब करुन दरवर्षी होणारेे माहेश्‍वरी वधु-वर परिचय संम्मेलन अशा विविध उपक्रमांद्वारे मंडळाने शहराच्या सामाजिक क्षेत्रात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्षभरातील मंडळाच्या कार्याचा आढावा व पुढील वर्षाची दिशा ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मिटींगमध्ये सन 2023-24 या वर्षासाठी सर्वानुमते मनीष मालपाणी यांच्यावर असलेली मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली. यावेळी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी सम्राट भंडारी, उपाध्यक्षपदी सुदर्शन नावंदर, खजिनदारपदी व्यंकटेश लाहोटी, सहखजिनदार आदित्य मालपाणी, सचिवपदी ओंकार इंदाणी व सहसचिवपदी आनंद लाहोटी यांच्या नावावर एकमत झाले.
राजस्थान युवक मंडळाने शहराच्या सामाजिक क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. मंडळाने सोपविलेली जबाबदारी विश्‍वासाने पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. शहरातील नागरीकांसाठी विरंगुळ्याच्या उपक्रमांसह आरोग्य आणि प्रबोधन या विषयावर काम करण्यास मोठा वाव आहे. येत्या कालावधीत त्यादृष्टीने प्रयत्न राहतील असे मालपाणी यांनी आपल्या निवडीनंतर बोलतांना सांगीतले. त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माहेश्‍वरी समाजातील विविध मान्यवरांसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here