शिवसेना (उबाठा) चे पालिकेला निवेदन
छाेटे व्यवसायिक माेठ्या आर्थिक विवंचनेत
संगमनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चुकीच्या व अन्यायकारक पद्धतीने हटवण्यात येणाऱ्या अतिक्रमण बाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात लघु व्यावसायिक, भाजीपाला, फळ व्यावसायिक, किरकोळ विक्रेता, स्टॉल वाला, टपरी धारक, धान्य व्यावसायिक, शेतकरी यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने राबविलेल्या असलेले अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्याची मागणी करण्यात आली. तसेच या व्यवसायिकांसाठी पर्यायी मार्ग काढण्याची विनंती करण्यात आली.
गेल्या काही दिवसापासून संगमनेर नगरपालिका हद्दीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. सदर अतिक्रमण हटाव मोहीम ही संगमनेरकरांच्या किंवा नगरपालिकेसाठी महत्त्वाची असली तरी सदर अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे सर्वसामान्य माणूस देशोधडीला लागलेला आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. कोणत्यातरी एका वादाच्या घटनेचा सुड समस्त छोट्या व्यावसायीकांवर वर उगावत आहे. यातील काही लोक पन्नास वर्षापेक्षा जास्त काळापासून सदर ठिकाणी व्यवसाय करत आहे. अगोदरच दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झालेले आहेत. अनेक लोक कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, व्यवसायामध्ये तोटा झालेला आहे आणि अशातच आपण ज्या पद्धतीने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहात यात हा छोटा व्यवसायीक उध्वस्त होणार आहे. ज्या ठिकाणी वाद झालेत त्या ठिकाणी अतिक्रमण काढणे गरजेचे होते. ते काढले त्याला विरोध नाही. व्यवसायिकांची काहीतरी पर्यायी व्यवस्था आपण लावून द्यावी व सदर प्रश्न कायमचा मार्गी लावावा असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी यांनी मांडले.
यावेळी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी देखील विनंतीपूर्वक सूचना केली व दीपक जी साळुंखे यांनी नवीन नगर रोड येथील टपरी धारकांबाबत सूचना मांडली व नेहरू चौक येथील व्यापारी भाजीपाला व्यवसायिक व धान्य दुकानदार याबाबत सूचना विनंती सुदर्शन ईटप यांनी केली तसेच आपण सदर अतिक्रमण धारक भाजीपाला विक्रेते सर्व व्यावसायिक लोकांना आहेत त्या ठिकाणी विशिष्ट सीमा आखून द्यावी, आपल्या नियमाच्या सीमेच्या बाहेर येऊन जर कोणी अतिरिक्त अतिक्रमण करत असेल तर आपण निश्चितच कारवाई करावी, परंतु कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या व्यवसायिकांना आपण अधिक त्रास न देता काहीतरी पर्याय काढावा ही विनंती जर आपण चार दिवसात योग्य तो निर्णय घेतला नाही तर आम्ही समस्त संगमनेर तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडी व सर्व अधिकृत संघटना व टपरीधारक गाळेधारक फळभाजी विक्रेता छोटे-मोठे स्टॉल वाले धान्य व्यावसायिक अतिक्रमणधारक सर्व आपल्या संगमनेर नगरपालिकेत ठिय्या आंदोलन उपोषण व इतर सर्व प्रकारचे आंदोलन करू सदर आंदोलनादरम्यान होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील आपणास विनंती आहे की आपण आमच्या मागणीचा शांततेने विचार करावा व कोणताही एकतर्फी निर्णय न घेता गोरगरीब जनतेचे व्यावसायिक बांधवांचे हाल थांबवावे ही विनंती
यावेळी शिवसेना शहरप्रमुखअमर भाऊ कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे,अपंग सेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, ,बाजार समिती सदस्य विजय सातपुते , उपशहर प्रमुख इम्तियाज शेख , वेणुगोपाल लाहोटी,दीपक वन्नम,दीपक साळुंके मुस्लिम मावळा अजीज मोमीन शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे उपतालुका प्रमुख वैशालीताई वडतल्ले, महिला आघाडी शहरप्रमुख संगीताताई गायकवाड, युवासेनेचे अक्षय बिल्लाडे, अमोल डुकरे,योगेश खेमनर, फैजल सय्यद, अक्षय गाडे, माधव फुलमळ,सदाशिव हासे, संकी पंजाबी, शेतकरी बांधव टपरीधारक अतिक्रमण धारक भाजीपाला फळ व्यावसायिक व किरकोळ विक्रेते उपस्थित होते