रोटरी क्लब संगमनेरच्या अध्यक्षपदी आनंद हासे तर सेक्रेटरीपदी मधुसुदन करवा यांची निवड


डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या गव्हर्नरपदी स्वाती हेरकळ यांची निवड

१६ जुलै रोजी होणार नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर –

रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या निवडी नुकत्याच जाहिर करण्यात आल्या. डिस्ट्रीक्ट गव्हर्नरपदी स्वाती हेरकळ यांची तर रोटरी क्लब संगमनेरच्या अध्यक्षपदी आनंद किसन हासे व सचिवपदी मधुसुदन चंद्रकांत करवा यांची निवड करण्यात आली. सन २०२३-२४ साठी ही निवड करण्यात आली आहे. रोटरी प्रांत ३१३२ हा महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा आणि ९१ क्लबचा मिळून बनलेला आहे. रो. स्वाती हेरकळ या रोटरी प्रांत ३१३२ च्या रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून १ जुलै २०२३ पासून जबाबदारी स्वीकारत आहेत. अनेक प्रांत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. द रोटरी फाऊंडेशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या अनेक ग्लोबल ग्रँट त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. संपूर्ण साक्षरता मोहिमेमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. रोटरीच्या माध्यमातून कृत्रिम अवयवदान शिबिरे राबविणे, ८५,००० शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण, पाणी पुरवठा योजना, शेळी प्रकल्प, आरोग्य सेवा सुविधा केंद्रे, ब्लड बँक अद्यायवतीकरण, बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी एनआयसीयू, अमेरिकेमधील आयोवा प्रांतात चार आरोग्य सुविधा केंद्रे उभारणी अशा अनेक प्रोजेक्ट्स त्यांनी पुढाकार घेवून यशस्वी केले आहेत. पर्यावरण, अंधत्व निर्मूलन, माता-किशोरवयीन मुलींसाठी वर्कशॉप्स, रायला, माती पुनःनिर्मितीसाठी शेतकाऱ्यांबरोबर काम, परिवर्तन ग्राम, युवकांसाठी अनेक उपक्रम त्यांनी २०२३-२४ या वर्षासाठी हाती घेतले आहेत.


नुतन अध्यक्ष आनंद हासे यांचा संगमनेर औद्योगीक वसाहतीत युवा पॉलिप्रिंट नावाने फ्लेक्झीबल पॅकेजिंग मॅन्युफॅक्चरींगचे युनिट आहे, तसेच दैनिक युवावार्ता या वर्तमानपत्राचे ते संचालक आहेत. सेक्रेटरी मधुसुदन करवा यांचे करवा एजन्सीज हे औषधी वस्तूंचा होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे तसेच ते बांधकाम क्षेत्रातही काम करतात. १९८४ साली स्थापन झालेल्या रोटरी क्लब संगमनेर या संस्थेने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. यावर्षी क्लब ४० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मागील वर्षी क्लबतर्फे गरजू विद्यार्थ्यांना ६५० शैक्षणिक टॅबचे मोफत वितरण, प्रोस्थेटिक हँड, जयपूर फुट याचे मोफत वितरण, तसेच मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया, सुमारे सुमारे २००० मोठी झाडे लावून ती जगविणे तसेच कोरोना काळात गरजू महिलांना मोफत १११ आटा चक्की तेसच ६५ शिलाई मशिन वाटप असे समाजोपयोगी प्रकल्प राबविले आहेत. रोटरी नेत्र रुग्णालयच्या माध्यमातून १९८९ पासून क्लबने ३२ हजारांपेक्षा जास्त मोफत मोतिबिंदू व तिरळेपणा शस्त्रक्रिया करुन त्याद्वारे आरोग्य क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे.


क्लबच्या सन २०२३-२४ साठी नियुक्त केलेल्या सदस्यांमध्ये अमित पवार, महेश वाकचौरे, ऋषिकेश मोंढे, दिपक मणियार, डॉ. प्रमोद राजुस्कर, ओंकार सोमाणी, सुनिल कडलग, संजय लाहोटी, डॉ. विनायक नागरे, डॉ. विकास करंजेकर, प्रमोद मणियार, दिलीप मालपाणी, भुषण नावंदर, मयुर मेहता, अजित काकडे, संजय राठी, मोहित मंडलिक, पवनकुमार वर्मा, रविंद्र पवार, सौरभ म्हाळस, विश्वनाथ मालाणी, डॉ. किशोर पोखरकर, नरेंद्र चांडक, योगेश गाडे, संदिप फटांगरे, सुनिल घुले, संजय कर्पे, महेश ढोले आदि सदस्यांची निवड करण्यात आली.
नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रविवार दि. १६ जुलै रोजी मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सत्यजित तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, रोटरी असिस्टंट गव्हर्नर क्षितीज झावरे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नूतन अध्यक्ष, सचिव व संपूर्ण कार्यकारिणीचे समाजातील सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख