शिवसेनेच्या पुढाकाराने भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा

0
1565

हक्काची व सावलीत जागा मिळाल्याने या भाजी विक्रेत्यांनी शिवसेनेचे (उबाठा) मानले आभार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे
– संगमनेर नगरपरिषदेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवत अनेक वर्दळीचे रस्ते मोकळे केले. तसेच रस्त्यावर व्यवसाय करणार्‍यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु या कारवाईमुळे अनेक छोट्या व्यवसायिकांचे संसार उघड्यावर पडले. रोजी रोटी बंद झाल्यामुळे अनेकांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले. या पार्श्‍वभूमीवर संगमनेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने या सर्व छोट्या भाजीविक्रेता, टपरीधारक, हातगाडी चालकांसह पालिकेवर मोर्चा काढत पर्यायी जागा देण्याची मागणी केली होती. त्यानूसार पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या पुढाकाराने शहरातील पेटीत हायस्कूल परिसरातील भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हक्काची व सावलीत जागा मिळाल्याने या भाजी विक्रेत्यांनी शिवसेनेचे (उबाठा) आभार मानले आहे.


शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर भाजीपाला, फळ विक्रेते, हातगाडीवर छोटा व्यवसाय करणार्‍यांची मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे वाहतूक कोंडीसह नेहमी वाहनांची वर्दळ व वादविवाद होत होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने कारवाई करत हे अतिक्रमण हटवले. मात्र त्यातून नवीन प्रश्‍न निर्माण झाल्याने शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी पुढाकार घेत या भाजीपाला विक्रेत्यांसह शिवसैनिकांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत पर्यायी जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज पेटीत हायस्कूल शेजारील अकोले रोडवरील ईदगाह शेजारी असणारी मोकळी जागा स्वच्छ करत झाडांच्या सावलीत या भाजीपाला विक्रेत्यांचे पुनर्वसन केले. याकमी संगमनेर पालिकेबरोबरच ईदगाह ट्रस्ट शहरकाजी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
रस्त्याच्या कडेला व्यवसाय करून हातावर पोट भरणार्‍यांची मोठी संख्या संगमनेरात आहे. परंतू रस्त्यावर दुकाने थाटल्याने अनेक प्रश्‍न निर्माण होतात. तात्पुरती जागा मिळताच त्यावर हक्क सांगितला जातो. किंवा त्याठिकाणी आणखी व्यावसायीक गर्दी करतात. त्यातून नवे प्रश्‍न निर्माण होत असल्याने असे अतिक्रमण हटविणे गरजेचे असते. परंतू त्यांच्याही पोटापाण्याचा प्रश्‍न लक्षात घेता पर्यायी जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे मत अमर कतारी, भाऊसाहेब हासे व शिवसैनिकांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here