बुलेटमधून फटाक्यांचे आवाजकाढणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा

बुलेट

संगमनेरमधील सुज्ञ जनतेचे पोलिसांना आवाहन

आवाजामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या

युवावार्ता (प्रतिनिधी)

संगमनेर – अलिकडच्या वर्षांत संगमनेरमधील तरुण बुलेट, एफ झेड, पल्सर या दुचाकींसाठी मोठ्या आवाजातील सायलेन्सरचा वापर करताना दिसत आहेत. हिरोगिरी करण्यासाठी या गाड्यांमधून फटाक्यांसारखा आवाज काढताना आपल्याकडे आणि गाडीकडे सर्वांचे लक्ष जावे हा त्यांचा हेतू असतो. मात्र या आवाजामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या जाणवताना दिसत आहे. वृद्ध, लहान मुले या आवाजामुळे दचकतात. झोपलेली लहान मुले दचकून उठतात. अशा बेमालूम तरुणांच्या पालकांनीसुद्धा आपला पाल्य काय करतो याकडे लक्ष दिले पाहिजे.पोलिसांनी मोटार वाहन कायदा (मोटार व्हेईकल ऍक्ट) वाहनांच्या निर्मितीच्या मूळ डिझाइनमध्ये छेडछाड करण्याची परवानगी देत ​​​​नाही. “फॅक्टरी मॉडेलमध्ये कोणताही बदल करणे हे एमव्ही कायद्याचे उल्लंघन आहे . मोठ्या फटाक्यांचा आवाज काढण्यासाठी तरुण सायलेन्सर बदलतात. बाईकच्या एक्झॉस्ट सिस्टीममध्ये बदल करण्यासाठी गॅरेज साधारणत: 2,500 रुपये आकारतात.


मॉड्युलर सायलेन्सर आणि सुधारित एक्झॉस्ट सिस्टीम चिंतेचे कारण आहे. ते फक्त रस्त्यांवर आणि परिसरात उपद्रव निर्माण करत नाहीत तर अपघात आणि लोकांमध्ये चिंता निर्माण करतात. वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांना सहसा गोंगाट करणाऱ्या बाइक्समुळे खूप त्रास होतो.उल्लंघन करणार्‍यांव्यतिरिक्त, सुधारित सायलेन्सर आणि हॉर्न विक्री आणि फिक्सिंगसाठी ऑटोमोबाईल दुकाने आणि मेकॅनिक्सवरसुद्धा गुन्हे नोंदविले गेले पाहिजेत.


पर्यावरण (संरक्षण) नियम, 1986 नुसार, मोटारसायकलची कमाल आवाज मर्यादा 80 डेसिबल असावी. तथापि, तरुण, बहुतेक विद्यार्थी, त्यांच्या बाईकचे री-मॉडेलिंग करत आहेत आणि सुमारे 130 डेसिबलचा आवाज उत्सर्जित करणारे बदललेले सायलेन्सर बसवत आहेत. सुधारित मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 190(2) नुसार, हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.तरी संगमनेरमधील या बेताल तरुणांविरोधात पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस यांनी कडक कारवाई करताना त्या गाड्यांचे सायलेन्सर जप्त करून गाडी सुद्धा जप्त करावी. बुलडोझर खाली हि सायलेन्सर तोडून टाकावीत. रोख रकमेत दंड करून १ वर्षासाठी त्यांचे लायसन्स रद्द करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख