दुर्गवैभवच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला मोठा ऐतिहासीक दस्तऐवज – विश्वास पाटील

0
1907

इतिहासकार श्रीकांत कासट यांच्या “दुर्गवैभव” मधून नवदुर्गप्रेमींना मिळणार प्रेरणा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – दुर्गम असलेल्या रायगडावर त्या काळात मला भेटलेले शिवभक्त श्रीकांत कासट हे दुर्गवेडे असल्याचे दिसून आले. त्यामुळेच सुमारे 40 वर्षांपासून शिवरायांचे साडेतीनशे गडकोट व त्यांच्यावरील प्रेमापोटी पाहिलेल्या कासट यांनी अभ्यास करताना सर्व गडकोटांची विविध कोनातून सुमारे दहा लाख छायाचित्रे काढली आहेत. हा इतिहासाचा मोठा दस्तऐवज भावी पिढ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले.


संगमनेरमधील गीता परिवारातर्फे आयोजित केलेल्या ज्येष्ठ दुर्गभ्रमंतीकार श्रीकांत कासट यांच्या ‘दुर्गवैभव महाराष्ट्राचे’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.


यावेळी विश्वास पाटील म्हणाले की, संगमनेरला भव्य दिव्य इतिहास लाभला आहे. शहाजी महाराज पेमगडावर राज्य करीत असताना त्यांच्या ताब्यात पुणे ते नाशिक या पट्ट्यातील 64 किल्ले होते. त्यांची राजधानी पेमगड होती. या काळात 31 वर्षांचा शाहिस्तेखान पेमगडावर चालून आला होता. गडकिल्ल्यांवर मराठीत अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. या गडांचे वेगळेपण, तेथील विविध महत्त्वपूर्ण घटना, प्रसंग, आलेले अनुभव या पद्धतीने कासट यांना भावलेला गड त्यांच्या शब्दात ‘दुर्गवेडा’ या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्यास भावी पिढीला त्यापासून प्रेरणा मिळेल. श्रीकांत कासट लिखित दुर्गवैभव महाराष्ट्राचे या पुस्तकातून अनेक गड किल्ल्यांचा इतिहास वाचकांच्या समोर चित्ररूपाने उभा राहणार आहे. त्यामुळे नव अभ्यासक, गड किल्ले प्रेमी यांच्यासाठी हा ऐतिहासीक दस्ताऐवज ठरून अनेकजण या वेळी हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहायक सचिव डॉ. ओमप्रकाश शेटे, प्रकाशक व राजवाडे संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा, उद्योजक मनीष मालपाणी, डॉ. संजय मालपाणी व श्रीकांत कासट यांनी मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here