२५० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी; ३० पारितोषिकांचे वितरण
संगमनेर (प्रतिनिधी) – लायन्स क्लब संगमनेर सफायर आयोजित शांततेचा संदेश अंतर्गत स्वप्न पाहण्याची हिम्मत या विषयावर आधारित भव्य चित्रकला स्पर्धा मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये ५ वी, ६ वी, ७ वी, ८ वी, आणि ९ वी अशा पाच गटांनुसार स्पर्धा झाली. यामध्ये केवळ संगमनेर शहर, ग्रामिण भागातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थांनी आपला सहभाग नोंदवला. २५० पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी २ तासांमध्ये पेन्सील, पेन, पॅड, वाॅटरकलर, क्रेऑन, पेन्सील कलर यांच्या सहाय्याने चित्र काढून रंगविण्याचा मनमुराद आनंद घेतला.
व्यासपीठावर लायन्स क्लब संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीष मालपाणी, अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा प्रकल्प प्रमुख सुनिता मालपाणी, देविदास गोरे उपस्थित होते. यावेळी संगमनेर सफायरचे श्रीनिवास भंडारी , महेश डंग, धनंजय धुमाळ, राजेश मालपाणी, उमेश कासट, कल्याण कासट, सुदीप हासे, अजित भोत, डाॅ. केदार सराफ, डाॅ. मधुरा पाठक, नम्रता अभंग, पूजा मर्दा, पूजा कासट, पुष्पा गोरे, स्वीटी दर्डा, डाॅ. अनुजा सराफ, प्रियंका कासट हे उपस्थित होते. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून राजेश ढगे व अशोक शिसोदे यांनी अथक परिश्रम घेतले.
चित्रकला स्पर्धा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विविध शाळांतील कलाशिक्षक पेडणेकर, गायकवाड, कासार, गोरे, बटवाल, कुरापाटी, थिटे यांचाही गौरव यावेळी लायन्स सफायरच्या वतीने करण्यात आला.
पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी उपस्थित होते. पाच गटातील एकूण ३० स्पर्धकांना यावेळी पारितोषिक वितरण करण्यात आले. अनुक्रमे पहिले पाच आणि उत्तेजनार्थ असे गुणानुक्रम काढण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, ट्राॅफी आणि सर्टिफिकेटचे वितरण करण्यात आले. इयत्ता पाचवी – शंतनू अमित सदाफळ (नालंदा विद्यालय, नगर), इयत्ता सहावी – अमोघ श्रीकांत वालझाडे (मालपाणी विद्यालय), इयत्ता सातवी – वेदश्री कैलास निकम (दि. ग. सराफ विद्यालय), इयत्ता आठवी – श्लोक संदीप कासट (श्री श्री रविशंकर विद्यामंदीर), इयत्ता नववी – आदित्य शिरीष कवडे (लोकमान्य विद्यालय, धांदरफळ) यांनी आपआपल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. याप्रमाणे एकूण ३० स्पर्धकांना पारितोषिक वितरीत करण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक मालपाणी उद्योग समूहाने प्रायोजित केले होते तर नाश्ता लोढा क्लासेस यांनी प्रायोजित केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुदीप हासे, नम्रता अभंग, डाॅ. अनुजा सराफ यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रकल्प प्रमुख सुनिता मालपाणी यांनी मानले.