जय मालपाणी आयर्नमॅन

आयर्नमॅन जय मालपाणी यांचे यश तरूणांना प्रेरणादायी

दैनिक युवावार्ता (विशेष प्रतिनिधी)
संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मनिष मालपाणी यांनी स्पेन देशाची राजधानी बार्सेलोना येथे झालेल्या आयर्नमॅन ७०.३ बार्सेलोना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून ही स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. भारतातून एकूण १४ स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. यामध्ये अनुक्रमे आयुष आपटे, विशेष नारंग, अश्विन, सागर म्हस्के, विजू वारघेसे, अतुल माविनकुर्वे, प्राची डुंबरे, सर्फराज मकानी, संपत डुंबरे, जय मनिष मालपाणी, धवल अजमेरा, भारत गोळे, तुषार देशपांडे, विक्रांत गायकवाड यांनी यश मिळविले.
१.९ किमी स्विमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते. प्रचंड कष्ट, इच्छाशक्की, मानसिक आणि शारिरिक तयारी, स्पर्धेच्या देशातील वातावरण, स्पर्धेचे दिवशी असलेली तब्येत या सर्वांचा कामगिरीवर परिणाम होत असतो.


पोहण्याचा कोर्स हा 1.9 किमीचा एक लॅप होता. जो कॅलेला बीचपासून सुरू होतो आणि क्रीडापटूंना पोहण्याच्या प्रारंभाच्या जवळच्या पाण्यातून बाहेर पडण्यापूर्वी उलट दिशेने भूमध्य समुद्रात घेऊन जातो.
बाईक कोर्स कॅलेला बीच येथे सुरू झाला आणि किनाऱ्यावर संपला. वन-लूप 90 किमी (56 मैल) हा कोर्स रोमांचक, जलद आणि सपाट किनारपट्टीवर झाला.
रनिंग कोर्स कॅलेला बीचपासून सुरू झाला आणि भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरून पिनेडा डी मार येथे वळण घेतले. टू-लूप 21.1 किमी (13.1 मैल) अशा पध्दतीने हा कोर्स संपला.
जय मनिष मालपाणी यांच्याकडून १.९ किमी स्विमींग ऐवजी २.९ किमी स्विमिंग झाली. या वाढलेल्या एका किलोमीटरमुळे त्यांना ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागला. हा वेळ कमी झाला असता तर भारतातील गुणानुक्रमामध्ये ते पुढे गेले असते. उद्योजक आणि तरूणांना प्रेरणा देणाऱ्या आयर्नमॅन जय मालपाणी यांचे युवा उद्योग समूहाच्या वतीने हार्दिक अभिनंदन !

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख