कळमजाई देवीचा धबधबा पर्यटकांना लागला खुणावू

निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता येणार

युवावार्ता (प्रतिनिधी)
निसर्गाच्या कुशीत, चारीही बाजूंनी डोंगर अन् दुधासारखा शुभ्र धबधबा त्यात हिरवा शालू पांघरलेला डोंगर हे सर्व मनमोहन दृश्य संगमनेर तालुक्यातील घारगावपासून काही अंतरावरच असलेल्या निसर्गाच्या कुशीतील कळमजाई देवीच्या मंदिर परीसरात पाहायला मिळत आहे. उंचावरून कोसळणार्‍या पांढर्‍या शुभ्र धारा आता पर्यटकांना खुणावू लागल्या आहेत.
घारगावपासून काही अंतरावरच व निसर्गाच्या कुशीत कळमजाई देवीचे पांडवकालीन मंदिर आहे. विशेष बाब म्हणजे हे मंदिर डोंगरातील गुहेत आहे. आणि जवळूनच मोठा प्रसिद्ध धबधबा वाहत आहे. चारही बाजूंनी घनदाट जंगल आहे. सध्या हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला पाहावयास मिळत आहे. कळमजाई देवीचे मंदिर असल्याने अनेक भाविकही याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने धबधब्याला पावसाळा सुरू असूनही पाणी नव्हते मात्र गणपती बाप्पाच्या आगमनानंतर पर्जन्यराजाचेही आगमन झाले. आणी परीसरात पाऊस झाल्याने धबधबा वाहता झाला आहे. संपूर्ण परिसर हा मनमोहक वाटत आहे. उंचावरून दुधासारखे शुभ्र पाणी कोसळत आहे, त्यामुळे कळमजाई देवीचा धबधबा आता पर्यटकांना खुणावू लागला आहे. या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांसाठी वनविभागाने विविध विकास कामे करत दोन मनोरेही बांधले आहेत. कळमजाई देवीचा धबधबा वाहता झाल्याचे पर्यटकांना धबधबा पाहण्याचा व निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख