Sunday, March 3, 2024

गुरुवारपासून कवी अनंत फंदी व्याख्यानमाला

व्याख्यानमालेसाठी मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

मागील ४५ वर्षापासून संगमनेर रसिक श्रोत्यांना वैचारिक व सांस्कृतिक मेजवानी देणाऱ्या त्याचबरोबर शाहिरी परंपरेचे मानबिंदू असणाऱ्या कवी अनंत फंदी यांच्या स्मृती चिरंतन ठेवणाऱ्या येथील कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार 30 नोव्हेंबर पासून 6 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेत अनेक दिग्गज वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने प्रकल्प प्रमुख ॲड. ज्योती मालपाणी, सौ. स्मिता गुणे यांनी दिली.
प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेचे यावर्षीचे पहिले पुष्प गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कवी अनंत फंदी नाट्यगृह येथे ज्येष्ठ पत्रकार, वृत्त संपादक, निवेदक व विविध विषयांचे अभ्यासक मिलिंद भागवत हे गुंफणार आहे. दुसरे पुष्प शुक्रवार रोजी डॉ. प्रचिती सुरू कुलकर्णी या “मुक्ताई… एक मुक्ताविष्कार” या संत मुक्ताई यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग करून संत मुक्ताबाई ची भक्ती, त्याग, समर्पन भाव उलगडणार आहे. शनिवार २ डिसेंबर रोजी प्रसिद्ध चित्रपट, नाट्य अभिनेत्री विभावरी देशपांडे या तिसरे पुष्प गुंफणार असून एक कलावंताचा मनस्वी प्रवास त्या श्रोत्यांसमोर उलगडणार आहे. रविवारी ३ डिसेंबर रोजी ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी लीना बनसोड हे प्रशासनातील आव्हाने व आनंद श्रोत्यांसमोर मांडणार आहे.

सोमवार ४ डिसेंबर रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे व पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे हे मेळघाट या आदिवासी भागात काम करताना आलेले अनुभव, अडचणी, मिळणारा आनंद “मेळघाटाच्या वाटेवरून चालताना” यातून श्रोत्यांना मेळघाटात घेऊन जाणार आहे. ५ डिसेंबर रोजी आर्थिक गुन्हेगारीचा शोध या अत्यंत आगळ्यावेगळ्या क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या डॉ. अपूर्वा जोशी “आर्थिक गुन्हेगारीचे जग व आपण” या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. या व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प भारतीय सैन्य दलातील निवृत्त वरीष्ठ अधिकारी परम विशिष्ट सेवा मेडल मिळविणारे व युध्दभूमिवर अनेक पराक्रम गाजवणारे ले. जनरल राजेंद्र निभोरकर हे “काश्मीर – काल, आज, उद्या” या विषयावर काश्मीरची परिस्थिती मांडणार आहे.
या व्याख्यानमालेसाठी मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकारनाथ बिहाणी, उपाध्यक्ष अरुण ताजणे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

‘पाहिजे त्या’ सुविधा मिळेना,कैद्यांचे अन्नत्याग आंदोलन

तहसीलदार धीरज मांजरे यांनी या घटनेची गंभीर दखलसंगमनेरचे कारागृह नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत...

आशा सेविकांचा घंटानाद आंदाेलनातून सरकारला इशारा

संगमनेरातील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात गेल्या पाच दिवसांपासून चुलबंद आंदोलनसंगमनेर - विविध...

प्रतिक्षा होती रेल्वेची, गती मात्र द्रुतगती महामार्गाला

संगमनेरच्या विकासाला मिळणार दुहेरी गती ?तालुक्यातील या गावातून जाणार महामार्ग

रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे कार्य अभिमानास्पद

माजी अध्यक्षांच्या सन्मानार्थ आयोजित सोहळ्यात रोटरी डिस्ट्रीक्ट 3132 च्या प्रांतपाल स्वाती हेरकळ यांचे गौरोद्गार

अत्याधुनिक उपचारांचे ‘एसएमबीटी मॉडेल’ ठरणार देशात आदर्श – डॉ रघुनाथ माशेलकर

एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट शानदार भूमिपूजन सोहळा; चार सेवांचा दिमाखात शुभारंभएसएमबीटी व टाटा उभारणार...