22 जानेवारीला देशात दिवाळी, संगमनेरातील पाच हजार लोकांना अयोध्येला नेणार – बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे संगमनेरात दाखल

बावनकुळेंच्या स्वागताला नागरिकांची अलाेट गर्दी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – 527 वर्षे तंबूत राहणार्‍या रामलल्लाला मोदी सरकारने अवघ्या 9 वर्षात मुक्त करत भव्य अशा मंदीरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असून 22 जानेवारी 2024 ला देशात सर्वात मोठी दिवाळी साजरी होणार आहे. या दिवाळीचे आपण सर्व साक्षीदार होणार असून संगमनेरातील पाच हजार नागरीकांना भाजप पक्ष आयोध्येला नेऊन रामलल्लाचे दर्शन घडवून आणणार आहे. मोदी सरकारने साडे नऊ वर्षात केलेल्या कामामुळे संगमनेरात देखील शंभर टक्के नागरीकांचे मोदींना समर्थन आहे. त्यामुळे 2024 ला पुन्हा एकदा देशात मोदींचेच सरकार येणार यात शंका नाही. असा मोठा अशावाद भारतीय जनतापक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.


आयोध्यातील राम मंदिर स्थापनेबद्दल ध्यवाद मोदीजी तसेच संपर्क से समर्थन, सुपर वॉरियर प्रमुखांशी संवाद या कार्यक्रमाअंतर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संगमनेरात आले असता एका छोट्याखानी सभेत ते बोलत होते. शहरातील मेनरोड येथे झालेल्या सभेत बोलतांना बावनकुळे म्हणाले मोदी सरकारने महिलांसाठी उज्वला गॅस, छोट्या कामगारांसाठी आखलेल्या योजना, काश्मिरमधील हटविलेले 370 कलम, चंद्रावर पोहचविलेल चांद्रयाण, आयोध्येतील राम मंदिर यासह अनेक प्रश्न सोडवून जनतेला मोठा दिलासा दिला. 2024 ते 2029 साठी मोठा संकल्प केला असून त्यातून देश जगात आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकणार आहे. मोदींवर 2014, 2019 या दहा वर्षात टाकलेल्या विश्वासामुळे व मोदींनी केलेल्या कामामुळे 2024 ला पुन्हा एकदा पहिल्यापेक्षा जास्त बहुमताने मोदी सरकार सत्तेवर येणार आहे. आपण राज्यात आत्तापर्यंत 44 हजार नागरीकांना प्रत्यक्ष भेटलो तर संगमनेरात 713 लोकांची भेट घेतली. संगमनेरातील या 713 पैकी 713 लोकांनी आपल्याला मोदीच पुन्हा पंतप्रधान पाहिजे असे सांगितले. मोदी पंतप्रधान का पाहिजे यावर अनेक लोकांंनी, तरूणांनी, महिलांनी मोदी सरकारने राबविलेल्या जलकल्याणकारी योजनांमुळे आपल्याला फायदा झाल्याचे सांगितले.
एक देश एक घटना, एक ध्वज म्हणून मोदींनी काँग्रेसह विरोधकांचा विरोध झुगारून 370 कलम हटविले. अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याने देशपातळीवर त्यांचे नेतृत्व उजाळून निघालेत तर जगाच्या पाठीवर दिडशे देशांनी मोदी हेच सर्वोत्तम नेते असल्याचे मान्य केले आहे. असे यावेळी बावनकुळे यांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे यांचे शहरात भाजपकडून जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते मोदी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणारे पत्रक नागरीकांना वाटप करणात आले. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, भाजप जिल्हाध्य विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख