आदित्यच्या यशाचे सर्वत्र काैतुक
संगमनेर ( प्रतिनिधी )
येथील टाटा लाईफ इ्शुरन्स कंपनीचे अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांना प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा बहुमान प्राप्त झाल्यामुळे ते ९ ते १२ जून २०२४ या कालावधीत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी व्हँकुव्हर या अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील क्लार्क काउंटीमध्ये असलेल्या कोलंबिया नदीच्या उत्तर तीरावरील शहरात या परिषदेत सहभागी होणार आहे.
आदित्य याला एमडीआरटी होण्यासाठी वडील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक सुनील कडलग यांच्यापासून प्रेरणा मिळाली . सुनील कडलग हे गेल्या २७ वर्षापासून म्युच्युअल फंड वितरक , जीवन व मेडिक्लेम विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. येथील कडलग इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात अतिशय पारदर्शक व प्रामाणिक सेवा व कार्य केले आहे. ग्राहकांच्या जीवनातील उद्दिष्टे प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आर्थिक क्षेत्रातील पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.
कोविड महामारीच्या दरम्यान कडलग यांनी अनेक कुटुंबांना विमा मृत्यूदावे प्राप्त करून दिलेले आहेत. आरोग्य विम्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना कोविड क्लेम प्राप्त करून देऊन आधार दिलेला आहे . समाजामध्ये अर्थसाक्षरता निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्रभर ते व्याख्याने देतात आणि वृत्तपत्रांमधून लेखनही करतात. जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक कार्यवाह , संगमनेर येथील रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त, रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे संचालक अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सुनील कडलग हे सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत.
जागतिक विमा परिषदेसाठी पात्र होण्यासाठी आदित्य कडलग यास टाटा लाईफ इन्शुरन्स कंपनीचे शाखाधिकारी धनंजय पाटील , विकास अधिकारी सुरज वानखेडे, सामजिक कार्यकर्ते व कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांचे मार्गदर्शन लाभले आहे . आदित्यच्या टाटा लाईफ एजन्सीच्या प्रदार्पणातच पहिल्याच वर्षी एमडीआरटी हा बहुमान प्राप्त झाल्याने कडलग इन्व्हेस्टमेंटची दुसरी पिढी या क्षेत्रात कार्यरत झाल्याचा संदेश दिला गेला आहे. आदित्यच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.