जलजीवन मिशनचे लोखंडी पाईप चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची थेट उत्तर प्रदेशात जाऊन कामगिरी

युवावर्ता (प्रतिनिधी) संगमनेर – तालुक्यातील तळेगाव दिघे येथे एका कंपाऊंडमध्ये जनजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेचे तब्बल ४३ लाख रुपयांचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत सचिन शरद रेवगडे वय ३२, धंदा इंजिनीअर, रा. हिवरगांव आंबरे, ता. अकोले हे लक्ष्मी सिव्हील इंजिनीअरींग सव्र्हसेस प्रा. लि. कोल्हापुर यांचे मार्फत आर. एम. कातोरे अॅण्ड कंपनी संगमनेर येथे साईट इंजिनिअर म्हणुन नोकरीस आहेत. त्यांनी सदर घटने बाबत फिर्याद दिल्यानंतर संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. ७२६ / २०२३ भादविक ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


तब्बल ४३ लाख पाच हजार रुपयांच्या पाईप चोरीची गंभीर दखल घेऊन अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर) यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
या आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई / सोपान गोरे, पोहेकॉ / मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोना / रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, संतोष लोढे, विजय ठोंबरे, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकों/अमृत आढाव, रोहित मिसाळ, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन वर नमुद गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना देवून पथकास आरोपींच्या शोधासाठी रवाना केले. हे पथक आरोपींचा शोध घेत असताना पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पाणी पुरवठा योजनेचे लोखंडी पाईप गौरीगंज, उत्तर प्रदेश राज्य येथील शिवकुमार सरोज व त्याचे इतर साथीदारांनी चोरी केले असुन त्याचे राहते घराजवळ ठेवलेले आहेत. तुम्ही आता गेल्यास सदर आरोपी मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्या नंतर या पथकाने लागलीच गौरीगंज, उत्तरप्रदेश येथे जावुन संशयीत इसम शिवकुमार सरोज याचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन त्याचे राहते घराजवळ जावून खात्री केली.

यावेळी त्याचे घराजवळ या पथकाला लोखंडी पाईप आढळून आले. या पथकाची खात्री होताच घरामध्ये असलेल्यास इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) शिवकुमार नानकऊ सरोज वय, रा. गौरीयाबाद, तहसिल गौरीगंज, उत्तरप्रदेश असे सांगितले. त्यांचेकडे घराजवळ असलेल्या लोखंडी पाईप बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन व पोलीस खाक्या दाखवून सखोल चौकशी करता त्याने त्यांचे इतर साथीदार नामे २) अरशद हसन खान रा. राज्य राजस्थान, ३) मोबीन जगमाल खान, ४) अहमद उस्मान खान, ५) खलीलमहंमद इसराईल खान, ६) सुनिल रामअवतार कुमार, ७) खुर्शिद मंगल खान, ८) मोहमंद आरिफ जोरमल, ९) तय्यब मंगलखान सर्व रा. मेवात, राज्य हरीयाणा १०) हासिम बसरु खान, ११) अलीम करीउद्दीन खान, मोहमंद अफजल जोरमल तिन्ही रा. नुह, राज्य हरीयाणा १२) ताजमहंमद रहेमान, रा. राज्य राजस्थान, १३) रईस इसाक खान, रा. राज्य हरीयाणा व १४) बबलु पुर्ण नाव व गांव माहित नाही (फरार) अशा साथीदारां सोबत ट्रक १) क्र. आरजे / ११ / जीसी / ०८९३, २) क्र. एचआर / ७४/७५९१ व ३) क्र. एचआर / ७४ / ३९८२ मधुन संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथुन लोखंडी पाईप ट्रकमध्ये भरुन चोरी केल्याची कबुली दिली. त्यास ३४,७६,३६४/- रुपये किंमतीचे विविध प्रकारचे ३६७ पाईप सह ताब्यात घेवुन संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

slh


सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख