विजय नागरी पतसंस्थेच्या नाशिक शाखेचा रविवारी शुभारंभ

0
1762

स्वामी श्रीकंठानंद यांच्या हस्ते होणार उद्घाटन

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मागील 33 वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहराच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणार्‍या विजय नागरी सहकारी पतसंस्थेने मोठी भरारी घेत थेट जिल्ह्याबाहेर आपली नवीन शाखा सुरू केली आहे. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीतील राधावल्लभ संकूल, रथचक्र चौक, इंदिरानगर येथे या नविन शाखेचा भव्य शुभारंभ रविवार दि. 31 डिसेंबर 2023 रोजी होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन पराग सराफ यांनी दिली.
नाशिक येथे सुरू होणार्‍या नविन शाखेचे उद्घाटन राष्ट्रीय श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थान नाशिकचे स्वामी श्रीकंठानंद यांच्या हस्ते होणार असून यावेळी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिकचे विलास गावडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नगरचे गणेश पुरी, संगमनेर उपनिबंधक संतोष कोरे, ब्राम्हण बिजनेस नेटवर्कचे संस्थापक श्रीपाद कुलकर्णी, नाशिक महापालिकेचे नगरसेवक सचिन कुलकर्णी, अ‍ॅड. शाम बडोदे, सतिश सोनवणे, सनिल खोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहाणार आहे. ग्राहकांच्या विश्वासावर संस्थेने 107 कोटी ठेवींचा टप्पा ओलंडला आहे. कर्ज वितरण, नियमित कर्ज वसुली, भक्कम स्वनिधी, तीन कोटींच्या आसपास नफा अशी संस्थेची भरभक्कम वाटचाल असून नविन शाखेच्या शुभारंभ प्रसंगी 150 दिवसांसाठी खास शुभारंभ ठेव म्हणून 8.25 टक्के तर ज्येष्ठ नागरीकांसाठी 8.50 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्हा. चेअरमन अनिरूद्ध उपासणी, सरव्यवस्थापक योगेश उपासणी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here