कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळ्यांचे केंद्र

कॅफे चालकावर गुन्हा दाखल, सहा जोडपे ताब्यात

तक्रार आल्यानंतरच कारवाई का?
शहरातील अनेक भागात अवैध धंदे चालू आहे. यात जुगार मटका तर नित्याचे आहे. आता कॅफे आणि हुक्का पार्लर सुध्दा धुमधडाक्यात सुरू आहे. या अवैध धंद्याची माहिती केवळ माध्यमांनाच नाही तर सर्व सामान्य आगरीकांना देखील असते. विशेष म्हणजे पोलीस यंत्रणेला मात्र सुगावा नसतो यावर कुणाचा विश्वास बसेल. मात्र वसुली आणि हप्तेखोरीमुळे अशा अवैध धंद्यांना अभय मिळते. कोणी याबाबत तक्रार केली तर मात्र थातूर मातूर कारवाईचा देखावा केला जातो. हे अनेक वेळा समोर आले आहे.

संगमनेर
संगमनेर शहरातील अकोले बायपासनजीक शहर एका कॅफे हाऊसवर कॅफे सोडून वेगळेच उद्योग सुरू असल्याचा सुगावा शहर पोलिसांना लागला. या सुगाव्याच्या आधारे टाकलेल्या छाप्यात सहा मुली आणि सहा मुले या कॅफेत आढळून आली. पोलिसांनी या मुला मुलींसह कॅफे चालक अभय चंद्रकांत गवळी याला ताब्यात घेतले. आणि पुन्हा एकदा शहरातील कॅफे संस्कृतीचा प्रश्न ऐरणीवर आला.


अल्पवयीन मुलींवर अत्याचारासारखा गंभीर प्रकार संगमनेरमधील एका कॅफे हाऊसमध्ये घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलीसांनी कारवाईचा धडाखा लावत काही कॅफे चालक, मालकांवर गुन्हे देखील दाखल केले होते. मात्र तरीदेखील संगमनेरमध्ये कॅफेतील विकृती थांबण्याची चिन्हे नाहीत.
शहर आणि परिसरातील कॅफे हाऊसमध्ये अनेक प्रकारचे उद्योग सर्रासपणे सुरू असतात. नावाला कॅफे हाऊस असणाऱ्या या कॅफे हाऊसमध्ये छोट्या छोट्या खोल्या बनविलेल्या आहेत. काही ठिकाणी भुयारी मार्ग देखील आहे. शहरातील काही लॉजिंगमध्ये अल्प मोबदल्यात जोडप्यांना “एकांत” उपलब्ध करून दिला जातो. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींची अशा कॅफे सेंटर आणि लॉजमध्ये सकाळी आठ वाजल्यापासूनच वर्दळ सुरू होते. संबंधितांकडून कारवाई करणाऱ्या यंत्रणेला ठराविक हप्ता पोहोचत असल्याने अशा प्रकाराकडे तक्रार नाही म्हणून दुर्लक्ष केले जाते. केवळ नावालाच असलेल्या एका कॅफे हाऊसमध्ये गैर कृत्य चालत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस पथक पाठवत खातरजमा केली असता तेथे पोलीस पथकाला सहा मुले, सहा मुली आढळून आल्या. विशेष म्हणजे सदर कॅफेमध्ये कोणतेही साहित्य नाही अथवा कोणताही कॅफेचा बोर्ड या पथकाला आढळून आला नाही.
उलट येथे जोडप्यांना एकांत मिळावा या उद्देशाने स्वतंत्र कप्पे बनवून एकांत उपलब्ध करून देण्यात आल्याचे समोर आले.
दरम्यान कॅफे हाऊसमध्ये आढळलेल्या मुला-मुलींसह कॅफे चालकाला देखील ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मथुरे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख