राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अमित अशोकराव भांगरे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी अधिकृत पत्र देत केली घोषणा

अकोले :- आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात अधिकृत पत्र देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते अमित अशोकराव भांगरे यांची निवड करत असल्याची घोषणा केली.

अकोले विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच शरद पवारांच्या पाठीशी उभा राहीलेला आहे. नुकत्याच घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे आ. लहामटे हे अजित पवार यांच्यासोबत भाजपच्या सत्तेत सामिल झाले. या गोष्टीची गंभीर दखल घेऊन नेहमीच एकनिष्ठ राहिलेल्या भांगरे यांना ताकद देण्यासाठी आता शरद पवारांनी देखील पुढाकार घेतला आहे.

या पुर्वी पिचड-पितापुत्रांनी देखील राष्ट्रवादीला रामराम करत भाजपाची वाट निवडली होती. तेव्हा शरद पवारांनी सर्व इच्छुकांना सोबत घेत एकास एक उमेदवार देऊन पिचडांचा पराभव करत डॉ. किरण लहामटे यांना आमदार केले होते.

पुरोगामी विचारांचा प्रतिनिधी या मतदारसंघात निवडून आणण्यासाठी व शरद पवार साहेबांच्या मागे उभे राहण्यासाठी ज्या भाजपाच्या विरोधात जनतेने लहामटे यांना निवडणून दिले त्याच भाजपासोबत अजित पवारांसोबत जात त्यांनी वेगळी चुल मांडली. यामुळे शरद पवारांनी आता पुन्हा एकदा अकोले विधानसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात संगमनेर अकोले विधानसभेचे पहिले आमदार हे शेंडी येथील स्व.गोपाळराव भांगरे होते. पुढे अकोले विधानसभेचे आमदार स्व. यशवंतराव भांगरे होते. त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन म्हणून स्व.लोकनेते अशोकराव भांगरे यांनी काम केले. तर सुनिताताई अशोकराव भांगरे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणुन दोन टर्म काम केले आहे. आणि हाच भांगरे घराण्याचा राजकीय वारसा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित भांगरे हे उत्तमरीत्या सांभाळत आहे. त्यांना पवारांनीच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर काम करण्याची संधी दिली असून आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उत्तर अहमदनगर च्या जिल्हाध्यक्ष पदाची नवीन जबाबदारी देत सक्रिय राजकारणात संधी दिली आहे.

भांगरे यांना ही नवीन जबाबदारी लहामटे यांना अकोले विधानसभा मतदारसंघात शह देण्यासाठीच दिली असल्याची चर्चा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख