चोरीच्या दोन घटनेत सोळा लाखांच्यादागिन्यांसह रोकड लंपास

डॉक्टर आणि किराणा दुकानदाराच्या घरात घरफोडी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर-
संगमनेर शहरासह तालुक्यात चोरट्यांनी उच्छाद मांडत पोलीसांना आव्हान दिले आहे. शहरात वारंवार चोरीसारख्या गंभीर घटना घडत असतांना चोर्‍यांचा तपास लागत नसल्याने चोरांची हिंमत वाढली आहे. तर नागरीक मात्र भयभीत आहे. शहरातील एक प्रतिष्ठीत डॉक्टर कुटूंब बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकत तब्बल 15 लाख 78 हजार रूपये किंमतीचे 526 ग्रॅम (अर्धा किलो) सोन्याचे दागिने लुटून नेले. तर शहरातील रहेमतनगर येथील एका किराणा दुकानदाराच्या घरात चोरट्याने 20 हजार रूपये किंमतीचे दागिणे तसेच 20 हजार रूपयांची रोकड असा 40 हजारांचा ऐवज लुटून नेला. शहरातील दोन घटनेत तब्बव 16 लाखांचे दागिने व 20 हजारांची रोकड चोरी गेल्याने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.


याबाबत शहर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नविन नगर रोड येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गिरीष सावंत यांच्या हॉस्पिटलच्या वरील मजल्यावर रहात्या घरात घडला. 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या दरम्यान घडला. तर दुसरा प्रकार काल बुधवारी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान रेहमतनगर येथील अकार कॉलनी येथे घडला. दरम्यान डॉ. सावंत दाम्पत्य शनिवार दि. 2 सप्टेंबरपासून बाहेरगावी गेले होते. यावेळी त्यांनी रहात्या घराला कुलूप लावले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गॅलरीतून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी अतील वेगवेगळ्या कपाटात उचकापाचक करत कपाटत ठेवलेले 15 लाख 78 हजार रूपयांचे 526 ग्रॅम सोन्याचे दागिने यात कलकत्ता मंगळसुत्र, पॉलर नेकलेस, पेंडन, राधे नेकलेस, स्टड इयररिंग, गळ्यातील चैन, मनीमंगळसुत्राच्या वाट्या, सोन्याचे क्वाईन आदि प्रकाराचा समावेश आहे. हे सर्व दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. बुधवारी डॉ. सावंत रात्री घरी आल्यानंतर घरात मोठी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत शहर पोलीसठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहे.


दुसरी घटना काल बुधवारी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान घडली. रेहमतनगर येथील अकार कॉलनी येथे सुरू असलेल्या इस्तेमासाठी फिर्यादी शखीला उर्फ अयशा जावेद शेख व त्यांची सासू गेली असता अज्ञात इसमाने फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्याने सुमारे 20 हजार रूपये किंमतीचे दागिने (सोन्याचे फॅन्सी गंठण) व 20 हजार रूपये रोख असा सुमारे 40 हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पालीस नाईक बी. के. धिंदळे करत आहे.
नेहमी गजबजलेल्या नविन नगर रोड परिसरातील व अनेक डॉक्टरांचे हॉस्पिटल असणार्‍या परिसरात हा गंभीर चोरीचा गुन्हा घडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून या चोरीचा तात्काळ तपास लावावा अशी मागणी डॉ. सावंत व परिसरातील नागरीकांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख