शिर्डीत महायुतीकडून आठवले व लोखंडे तर महाआघाडीकडून वाकचौरे व घोलप यांच्यात रस्सीखेच

उमेदवार भाजप व शिवसेना प्रणित असल्याने या मतदार संघाकडे सगळ्यांचे लक्ष

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करून गृहीनींना मोठा दिलासा दिला तर लवकरच पेट्रोल- डिझेलचे दर कमी करून महागाईवर नियंत्रण अणण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात येणार आहे. यावरून देशात लवकरच लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणूका लागण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक मतदार संघात उमेदवारी मिळविण्यासाठी त्या -त्या पक्षात रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. तर शिर्डी लोकसभा मतदार संघात रिपाईचे रामदास आठवले यांनी दावा ठोकला असून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनीही आपणाच उमेदवार असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे महाआघाडीकडून हा मतदारसंघ शिवसेनेला असल्यामुळे शिवसेनेत पुन्हा आलेले मजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व शिवसेनेचे निष्ठावाण माजी मंत्री बबनराव घोलप या दोघांनीही दावा सांगितल्याने महाआघाडीतही सर्व अलबेल नसल्याचे समोर येत आहे.


संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव व नेवासा या सहा तालुक्यांचा समावेश असलेला शिर्डी मतदारसंघ अनुसूचीत जातीसाठी राखीव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र राज्यात झालेल्या राजकीय फाटाफुटीनंतर सर्व समीकरण बदलले गेले आहे. भाजप व शिवसेना वेगळे झाल्यानंतर या मतदार संघातील उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. एनडीएचा घटक असलेल्या रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा इरादा केला आहे. तर सध्या शिंदे गटाकडे गेलेल्या या मतदार संघावर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपला दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे एनडीएकडून शिर्डीची जागा आठवले की लोखंडे यापैकी कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे महाआघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर आपला दावा कायम ठेवल्याने शिवसेना (ठाकरे) गटाने आपली रणणीती अखण्यास सुरूवात केली आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा स्वगृही आल्याने त्यांनाच उमेदवारी मिळेल असा तर्क बांधला जात असतांना गेल्या काही दिवसांपासून संपर्क प्रमुख म्हणून माजी मंत्री बबननाना घोलप यांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले होते. मात्र वाकचौरे पक्षात आल्याने त्यांच्या अशेवर पाणी फिरणार असल्याचे दिसत आहे. वाकचौरे यांचा दहा वर्षांपूर्वी या मतदार संघात प्रभाव होता. मात्र आता तशी परिस्थिती नाही. त्यातही या मतदार संघात काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्राभल्य आहे. उमेदवार मात्र भाजप व शिवसेना प्रणित असल्याने या मतदार संघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख