संगमनेरची सायकलपटू प्रणिता सोमण शिवछत्रपती राज्य क्रिडा परस्काराने सन्मानित

संगमनेरकरांसाठी ऐतिहासिक क्षण, सर्वच स्थरातून अभिनंदन

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या दिग्गजांना राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यात संगमनेरची प्रसिद्ध सायकलपटू प्रणिता सोमण हिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे संगमनेरकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.


राज्यात क्रीडा संस्कृतिचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षाचे पुरस्कार शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 14 जुलै रोजी जाहीर करण्यात आले होते. सोमवारी पुणे येथे या पुरस्काराचे वितरण झाले.
महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये देणार असल्याचेही जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले, कै. खाशाबा जाधव हे सर्वांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिन दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. क्रीडा पुरस्काराच्या रकमांमध्ये वाढ करावी ही गेली काही वर्षे मागणी होती त्यानुसार आम्ही जीवनगौरव पुरस्कारासाठी तीन लाख रुपये ऐवजी पाच लाख रुपये तर अन्य क्रीडा पुरस्कारांसाठी एक लाख रुपयाला आयोजित तीन लाख रुपये देण्याचे जाहीर करीत आहोत. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवावा या दृष्टीने महाराष्ट्राच्या खेळाडूंना आम्ही काही कमी पडून देणार नाही आमचे शासन सदैव त्यांच्या पाठीशी असणार असल्याचे सांगितले.


प्रणिता सोमण ही सराफ विद्यालयाची सायकलिंग खेळाडू होती. विद्यालय दशेत सायकलिंग बरोबरच तिने बुद्धिबळ, नेटबॉल, ट्ग-ऑफ-वॉर या खेळ प्रकारातही राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तिने अहमदनगर येथील सारडा महाविद्यालयातून प्रा. संजय साठे व प्रा.संजय धोपावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग स्पर्धेत राष्ट्रीय व एशियन गेम पर्यंत मजल मारत महाराष्ट्र संघाला अनेक पदक मिळवून दिले. प्रणिताचे वडील बाल शिक्षण मंडळाचे खजिनदार डॉ. प्रफुल्ल सोमण यांनाही सायकलींची आवड असून प्रणिताच्या यशामागे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा आहे. प्रणिताला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्यानंतर सर्वच स्थरातून तीचे अभिनंदन व कौतूक होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख