घरफोडीत, २ लाख ३५ हजारांचे दागिने लंपास

chori

नागरीक भयभीत

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून लॉकरमध्ये ठेवलेले 2 लाख 35 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लांबविल्याची घटना शहरातील कुरण रोड परिसरात घडली आहे. शहरातील कुरण रोड परिसरात राहणार्‍या समरिन साजिद पठाण यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने लॉकर मधून दागिन्यांची चोरी केली.
चोरट्याने 42 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम 200 मि. ली वजनाचा सोन्याचा नेकलेस, 9,500 रुपये किमतीचे 2 ग्रॅम 580 मिली वजनाचे सोन्याचे पेंडल, 38 हजार रुपये किमतीचे 19 ग्रॅम 900 मिली वजनाचे सोन्याचे कानातले जोड, 39 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचा सोन्याची साखळी 1200 रुपये किमतीचे 280 मिली वजनाचे सोन्याचे पेंडल, 3750 रुपये किमतीचे 2 ग्रॅम 250 मिली वजनाचे सोन्याची अंगठी, 1270 रुपये किमतीचे 560 मिली वजनाचे सोन्याचे कानातले जोड, 1270 रुपये किमतीचे 560 मिली वजनाचे सोन्याचे पेंडल, 1326 रुपये किमतीचे 860 मिली वजनाचे सोन्याचे 16 मणी, 1191 रुपये किमतीचे 490 मिली वजनाचे सोन्याचे 24 मणी, 72 हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम 790 मिली वजनाचे सोन्याचे गंठण, 12 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम 230 मिली वजनाचे सोन्याचे पेंडल, 325 रुपये किमतीचे 5 ग्रॅम 280 मिली वजनाचे चांदीची आंगठी, 620 रुपये किमतीचे 930 मिली व 25 मिली वजनाचे चांदीची पैंजण, 890 रुपये किमतीचे 15 ग्रॅम व 550 मिली वजनाचे चांदीचे कडे, 920 रुपये किमतीचे 17 ग्रॅम वजनाचे चांदीची चेन, 10 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2 लाख 35 हजार 262 रुपयांचे दागिने चोरून नेले.
याबाबत समरिन पठाण या महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 4/2024 भारतीय दंड संहिता 454, 457, 380 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक एल. आर. जाधव हे करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख