प्लॉट खरेदी करण्यास मदत न केल्याने पती-पत्नीस मारहाण

गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – फिर्यादीच्या घराशेजारील प्लॉट आरोपींना घेता आला नाही. तसेच हा प्लॉट खरेदीसाठी फिर्यादीने सहकार्य केले नाही याचा राग मानात धरून आरोपी व त्याच्या मुंबईच्या मित्राने फिर्यादीसह तीच्या पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 29 /12/2023 रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास शहरातील कृष्णानगर या ठिकाणी घडली.
याबाबत फिर्यादी प्रियांका माणिक हासे (रा. कृष्णानगर, ता. संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हंटले आहे की, आम्ही राहतो तेथेच आमच्याजवळ एक प्लॉट विक्रीसाठी होता. हा प्लॉट आरोपी संदीप डोंगरे याला घ्यायचा होता. परंतू तो प्लॉट फिर्यादीचे पती माणिक हासे यांच्या मित्राने खरेदी केला. याचा राग मनात धरून संदीप डोंगरे व त्याच्या एका मित्राने 29 डिसेंबर रोजी रात्री फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीला धमकी देत तू तुझ्या मित्राला प्लॉट घेण्यासाठी मदत का केली असे म्हणत वाद घातला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली असता संदीप डोंगरे यांने माणिक रामनाथ हासे यांना लाथाबुक्क्यांनी व त्याच्या मित्राने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी पतीला सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नीला देखील या आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत दोघांनाही चांगलाच मार लागला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संदीप डोंगरे (पुर्ण नाव माहिती नाही) व त्याचा अनोळखी मित्र यांच्यावर गुन्हा रजि. नं. 1060 भादंवि 324, 323, 504, 506, 34 नुसार दाखल केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख