अजितदादा पवार यांच्या हस्ते अकोले तालुका कार्यकारणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर
युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा कार्यकारणी व अकोले तालुका कार्यकारणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली.
अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीत महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वातीताई संदीप शेणकर, जिल्हा सरचिटणीसपदी भीमाशंकर प्रभाकर कवडे, जिल्हा संघटकपदी अॅड दत्तात्रय माधव निगळे, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी बबन वाळुंज, जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी संतोष दिनकर बोटे, अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी शरद कारभारी चौधरी, कार्याध्यक्षपदी ईश्वर सोमनाथ वाकचौरे तसेच सचिवपदी प्रशांत रावसाहेब धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली.