सचिन तेंडुलकर व्हायचे असेल तर खडतर प्रयत्न करा- डी. वाय. एस. पी वाघचाैरे

व्हीजन काेचिंग क्लासेसकडून 10 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

करिअरमधील विविध संधींविषयी केले मार्गदर्शन

संगमनेर (प्रतिनिधी) –
जगात अनेक नावाजलेली व दैदिप्यमान यश मिळवलेली माणसे आहेत.त्यांचे यश अपणाला दिसते मात्र त्यामागील प्रयत्न दिसत नाही. अशाच यशस्वी व्यक्तींपैकी एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर हे होय. प्रत्येकाला सचिन व्हावेसे वाटते पण सचिनसारखे कष्ट नको असतात. असे चालणार नाही. तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचे असेल व इच्छित ध्येय गाठायचे असेल तर योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत. ती योग्य दिशा दाखविण्याचे काम विद्या विद्यापीठ ही संस्था करीत आहेत. हे बघून मला अत्यानंद झाला. डॉ.नामदेवराव गुंजाळ यांनी मला येथे येण्याची व मार्गदर्शनाची संधी दिली हे मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन संगमनेरचे विभागीय पोलीस आयुक्त डी.वाय एस.पी सोमनाथ वाघचाैरे यांनी केले आहे.
विद्या विद्यापीठ संचलित व्हिजन कोचिंग इन्स्टीट्युट च्या वतीने आयोजित केलेल्या 10 वीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयापीठाचे अध्यक्ष डॉ.गुंजाळ हे होते तर व्यासपीठावर प्रा. राहुल मिश्रा, प्रा. सुनिल सुतार, डॉ.हर्षवर्धन गुंजाळ आदि मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलतांना वाघचाैरे म्हणाले कि, अभ्यास व करिअरच्या वाटा हा माझा जिव्हाळ्यााचा विषय राहिला आहे. मला मार्गदर्शन मिळण्यासाठी खूप आटा पिटा करावा लागला.पण तुम्ही सर्व विद्यार्थी भाग्यवान आहात कि तुम्हाला व्हिजन कोचिंग इन्स्टीट्युट तुमच्या गावातच आहेत.व खास अनुभवी व त-ा शिक्षक तुमच्या अध्यापणासाठी आहेत. या संधीचा फायदा संगमनेर, अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यासह पालकांनी घेतला पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी अध्यक्ष डॉ.नामदेवराव गुंजाळ म्हणाले कि, आम्ही ग्रामीण भागातून आलो असल्याने ग्रामीण भागातील मुलांच्या समस्या आम्हाला चांगल्या माहिती आहेत. घरातील एकाने जरी उच्च शिक्षण घेतले तरी घरची परिस्थिती बदलून जाते. एवढेच नाही तर कुटूंबातील पुढील पिढ्यांना योग्य दिशा मिळते. याचा विचार करुन आता पालकांनी जागृक होवून आपल्या पाल्यांना इंजिनीअर, डॉक्टर व प्रशासकीय सेवेत पाठविले पाहिजे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व दिशा देण्यासाठी व्हिजन कोचिंग इन्स्टीट्युट तुमच्या पाठीशी सदैव असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.


यावेळी कोटा येथील त-ा शिक्षक प्रा.राहूल मिश्रा यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ.हर्षवर्धन गुंजाळ यांनी केले आभार व सुत्रसंचलन व्यवस्थापक दीपक पावसे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख