संगमनेरात वीजेच्या लपंडावाचे तांडव


ग्राहक घामाघूम, संताप अनावर, अधिकर्‍यांचे दुर्लक्ष

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे –
गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेरात विजेचा लंपडाव सुरू आहे. मात्र आज मंगळवारी वीज वितरण कंपनीने कहरच केला. बाहेर उन्हाचा तीव्र तडाखा असतांना पाच पाच मिनीटांचा शटडाऊन घेतला जात असल्याने नागरीक घामाघूम झाले. सोबतच अनेकांच्या घरातील वीजेच्या उपकरणे या विजेच्या झटक्यामुळे खराब झाले. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने अनेक शासकीय, खासगी कार्यालयातील कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या गंभीर समस्येकडे वीज वितरण कंपनीने तातडीने लक्ष द्यावे अन्यथा नागरीकांचा संताप अनावर झाल्यास त्यांच्या मोठ्या रोषाला वीज वितरण कंपनीला सामोरे जावे लागेल.


जून ची 12 तारीख उजाडली तरी अजून आपल्याकडे पावसाला सरूवात झाली नाही. सुर्य अजूनही आग ओकत आहे. आशा परिस्थितीत नागरीकांना वीजेच्या उपकरणावरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यात थोडा जरी खंड पडला तरी मोठे नुकसान होत आहे. दरम्यान संगमनेरात गेल्या काही दिवसांपासून वीजेच्या खेळखंडोबाच्या अनेक घटना वारंवार घडत आहे. ज्या पद्धतीने वसुलीसाठी वीज वितरण कंपनी तगादा लावते. त्या पद्धतीने वीजेच्या समस्येकडे मात्र दुर्लक्ष करते. शहरातील अनेक भागात एकाच डीपीवर प्रमाणापेक्षा जास्त भार येत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. नविन अकोले रोड, सावतामाळी नगर या नव्याने विकसीत झालेल्या भागात मोठ्या प्रमाणावर व्यापारी संकुले उभे राहिले आहे. या सर्व व्यावसायीकांच्या वीजेचा भार हा पोलीस स्टेशनजवळील एका डीपीवर टाकलेला आहे. वाढत्या वीजेची गरज लक्षात घेता हा भार विभागून जाणे गरजेचे आहे. मात्र महावितरण त्याकडे दुर्लक्ष करते. आज मंगळवारी शहरातील बाजारपेठ बंद असली तरी अनेक उद्योग, व्यावसाय सुरू असतात. मात्र पाच -पाच मिनीटाला वीज गायब होत असल्याने चालू उपकरणे अचानक बंद पडतात. वारंवार असे होत असल्याने नागरीकांची कामे खोळंबलीच मात्र त्यांना मोठा मनस्तापही सहन करावा लागला. लागोपाठच्या या शडडाऊनमुळे अनेकांनी वीज मंडळाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र तक्रार घेण्यासाठीही त्याच्या कार्यालयात माणूस नाही. अशा या गलथान कारभारामुळे वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. वरिष्ठांनी याबाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी मागणी सर्वसामान्य वीज ग्राहकांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख