पर्यावरण प्रेमींनी पुन्हा वाळू साठा नष्ट करत जाळल्या गोण्या

प्रवरा पात्रातील वाळू तस्करी थांबता थांबेना

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे
– मोठा गाजावाजा करत महसूल मंत्र्यांनी नवीन वाळू धोरण जाहीर करून ठिकठिकाणी शासकीय दराने वाळूची दुकाने सुरू केली आहेत. मात्र अजूनही ग्राहकांना ही शासकीय वाळू मिळत नाही. या नव्या धोरणामुळे वाळू तस्करीला लगाम घातला जाईल तसेच तस्करांवर ड्रोन द्वारे लक्ष ठेवले जाईल असे जाहीर करण्यात आले मात्र त्याचे पुढे काय झाले हे महसूल विभागालाच माहीत आहे. कारण प्रवरा पात्रातील वाळू तस्करी मात्र अजूनही थांबायचे नाव घेत नाही.


वाळू तस्करांचे प्रिय ठिकाण असणार्‍या गंगामाई घाटावर होणार्‍या वाळू तस्करीला येथील पर्यावरण प्रेमींनी तिव्र विरोध केल्यानंतर काही काळ थांबलेली वाळू तस्करी पुन्हा सुरू झाली. महसूलच्या आशिर्वादाने सुरू झालेल्या या वाळू तस्करीचा प्रयत्न संगमनेरच्या नागरिकांनी, व्यापारी मित्रांनी मात्र पुन्हा एकदा हाणून पाडला आहे. संगमनेर शहरात वाळू तस्करी हा नेहमीच वादाचा व ऐरणीवरचा विषय राहिला आहे. तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ नेहमीच पाहण्यास मिळतो. प्रवरा नदी पात्रातील गंगामाई घाटापासूनचा परिसर वाळू तस्कर नेहमीच निवडत असतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असते. मागील काही दिवसांपूर्वी या ठिकाणी वाळू तस्करांनी भरून ठेवलेल्या वाळूच्या शेकडो गोण्या गंगामाई घाट परिसरात फिरायला येणार्‍या संगमनेरच्या नागरिकांनी, व्यापारी मित्रांनी आंदोलन करत वाळू पुन्हा नदीत फेकून गोण्या जाळून नष्ट केल्या होत्या व वाळू तस्करी विरुद्ध तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.
त्यानंतर पुन्हा गंगामाई घाटावर फिरायला जाणार्‍या नागरिकांना आणि व्यापार्‍यांना वाळू तस्करी होत असल्याचे दिसून आले. गंगामाई घाटाच्या पायर्‍यांवर वाळू तस्करांनी रात्री चोरून ठेवलेली वाळू गोण्यांमध्ये भरून ठेवली होती. या गोण्यातली वाळू पुन्हा नदीत ओतून नागरिकांनी या गोण्या जाळून टाकल्या आहेत. पोलीस व महसूल प्रशासनाला वारंवार विनंती करूनही येथील वाळू तस्करी थांबत नाही यामागचे गौडबंगाल नेमके काय आहे याचीच चर्चा आता होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख