म्हाळुंगी पुलासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर

श्रेय कुणाचे थोरात, विखे की लोखंडेंचे?

लवकरच या पुलाचे कामाला सुरूवात
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
संगमनेर शहरातील साईनगर, पंपिंगस्टेशन, गंगामाईघाट तसेच अनेक धार्मिक मंदिरांना जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पुल पडून अनेक महिने उलटून गेले. या पुलाची दुरूस्थी अथवा नविन पुल वव्हावा अशी मागणी या परिसरातील नागरीक सातत्याने करीत होते. अखेरीच या पुलासाठी साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या पुलाचे काम सुरू होणार आहे. मात्र नेहमीप्रमाणे राजकीय नेत्यांमध्ये श्रेयवाद चांगलाच रंगला असून सोशल माध्यमांवर नेत्यांचे कार्यकर्ते आमच्याच नेत्याच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाल्याच्या पोस्ट पाठवत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना या पुलाच्या निधीचे श्रेय आमदार थोरात, नामदार विखे, खासदार लोखंडे या पैकी कुणाला द्यायचे असा प्रश्‍न पडला आहे.


म्हाळूंगी पुलाखालून गटारीचे काम करत असतांना या पुलाच्या कॉलमला धक्का लागल्याने पुलाचा एक भाग कोसळला. त्यामुळे हा पुल वाहतूकीस बंद करण्यात आला. गेली सहा महिन्यांपासून येथील वाहतूक बंद असून या परिसरातील नागरीकांना मोठा वळसा घालून आपल्या घरी, शाळेत व फिरण्यासाठी जावे लागत आहे. या पुलाचे काम तातडीने करावे या मागणीसाठी अनेक वेळा मोर्चे काढण्यात आले. निवेदने देण्यात आले. लोकप्रतिनिधी म्हणून आ. बाळासाहेब थोरात यांनीही शासनाकडे निधीची मागणी केली. त्यानंतर महसूल मंत्री व पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही म्हाळूंगी पुलासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार केला तर मतदार संघात क्वचित दिसणारे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही या निधीसाठी प्रयत्न केल्याचा दावा त्यांचे समर्थक करत होते. अखेर या पुलासाठी साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र हा निधी संगमनेर शहरात पालीकेच्या माध्यमातून होत असलेल्या व्यापारी संकूलनाच्या निधीतून वळविण्यात आल्याचे अधिकार्‍यांचे म्हणने आहे. या तुटलेल्या पुलासाठी थेट शासनाकडून किंवा एखाद्या खात्याकडून निधी मंजूर झालेला नसून तो दुसर्‍या कामातून वळविण्यात आला आहे. मात्र नेहमीप्रमाणे श्रेय वादासाठी राजकीय पुढारी व त्यांचे चेले-चपाटे आपल्याच नेत्याच्या कर्तृत्वामुळेव मेहरबानीमुळे निधी मिळाल्याचा डंका पिटवत आहे.


वास्तविक हा पुल गटारीचे काम करणार्‍या संबंधीत ठेकेदाराच्या चकीमुळे पडलेला आहे. प्रशासनाकडून त्याबद्दलचा कोणताही जाब त्या ठेकेदाराला विचारण्यात आला नाही. किंवा त्याची भरपाईही घेण्यात आली नाही. पुल तुटल्यानंतर येथील शाळकारी मुले, ज्येष्ठ नागरीक, महिला यांचे मोठे हाल झाले आहे. याची कोणतीही दखल श्रेय घेणार्‍या नेत्यांनी घेतली नाही. मोठ्या कालावधीनंतर या पुलासाठी दुसरीकडचा निधी वळविण्यात आला असून त्यातून सुमारे साडेचार कोटी रूपयांचा हा संपूर्ण पुल बांधण्यात येणार आहे. वास्तविक या पुलासाठी या परिसरातून नागरीकांसोबत भाविक, विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते यांचा मोठा रेटा होता. पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनीही यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे हा पुल लवकरच पुन्हा एकदा उभा राहणार आहे. मात्र राजकारणी व त्यांचे कार्यकर्ते श्रेय वादासाठी तुटून पडले आहे. आपल्या नेत्याचे पत्र फॉरवर्ड करून त्यांच्यामुळेच सदर निधी मिळाला असे भासवत आहे. निधीसाठी सर्वच नेत्यांनी पाठपुरावा केलेला आहे. मात्र जनतेचे काम होत असेल, जनतेला दिलासा मिळत असेल तर त्याचे स्वागत करण्याऐवजी श्रेय घेणे कितपत योग्य आहे असा प्रश्‍न नागरीक विचारत आहे. सरकार बदल्यानंतर अनेक जुने कामाचे उद्घाटन करण्याचे भाग्य नविन सत्ताधार्‍यांना मिळत असते. मात्र याचा अर्थ त्यांच्याच पुढाकाराने ते काम झाले असे होत नाही. कदाचित पुल झाल्यानंतर उद्घाटन करणारे वेगळेच असतील.!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख