श्रेय लाटण्याची स्पर्धा वास्तवाशी फारकत घेणारी व सर्वसामान्य जिरायतदार शेतकर्यांची दिशाभूल करणारी
युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले – उच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी गुन्हा दाखल होण्याचा धसका घेऊन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 मे रोजी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची प्राथमिक चाचणी घेतली. त्यानंतर भाजपासह शिंदे गट व मविआ घटक पक्षांसह माजी मंत्री, खासदार, आमदार व विविध नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे मात्र ती पूर्णपणे राजकीय लाभापोटी व निरर्थक आहे. निळवंडेतून पाणी सोडण्याच्या चाचणीचे संपूर्ण श्रेय हे उच्च न्यायालयाने 18 जानेवारी 2023 रोजी पारित केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीचे असल्याचा दावा निळवंडे धरण कालवा कृति समितीचे अध्यक्ष नानासाहेब जवरे यांनी केला.
अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत जवरे बोलत होते. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कालवा कृतिसमितीचे उपाध्यक्ष संजय गुंजाळ, उद्योजक चौधरी यावेळी उपस्थित होते. जवरे म्हणाले, की निळवंडे डाव्या कालव्यातून 31 जूनका डामडौल करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत चाचणीसाठी पाणी सोडण्यात आले. नंतर त्यासाठी आपणच किती व कसे जबाबदार आहोत, याचे तुणतुणे वाजवून श्रेय लाटण्याची मोठी स्पर्धा सुरू झाली. विविध राजकीय नेत्यांसह पदाधिकार्यांकडूनही संधीसाधू, तकलादू व वास्तवाशी फारकत घेणारी व सर्वसामान्य जिरायतदार शेतकर्यांची दिशाभूल करणारी आहे. वास्तवात निळवंडे धरण लाभक्षेत्रातील कथित नेत्यांसह पदाधिकार्यांसह कालव्यांची कामे यापूर्वी धरणग्रस्त व तद्नंतर कालवेग्रस्तांना पुढे करून कसे खोडे घालून रखडवण्याचे काम केले आहे, याचे अनेक पुरावे कृती त्यापैकीच गरजेनुसार काही उच्च न्यायालयातही दाखल केले आहेत. लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या शेतात पाणी पोहचायला किती कालावधी लागणार, याबाबत कोणीच खरे बोलत नाहीत. निळवंडे कालवा कृती समितीमार्फत विक्रांत काले यांचे नावे संस्थापक नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन 18 जानेवारी 2023 रोजी पाणी सोडण्याचे आदेश दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते निंब्रळ येथे 31 मे रोजी मोठ्या डामडौलात पार पडला. वकील अॅड अजित काळे व त्यांच्यामार्फत याचिका दाखल करणार्यांना आदरपूर्वक सहभागी होण्याचे निमंत्रण देणे नैतिकदृष्या आवश्यक होते. तेच खरे लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या कौतुकास व पाणी चाचणीचे श्रेय घेण्यात पात्र ठरू शकतात, असा दावा जवरे यांनी केला.
निळवंडे भागातून दुष्काळी भागाला पाणी मिळणार या आशेवर गेली 50 वर्षे लाभ क्षेत्रातील शेतकरी जगत आहे. आज कुठेतरी चाचणीच्या निमित्ताने का होईना निळवंडे कालव्याला पाणी आले. जनतेचा सातत्याचा दबाव व न्यायालयाने केलेले आदेश यामुळे आज कालव्यात पाणी वाहू लागले आहे. मात्र राजकीय नेते श्रेयवादाच्या लढाईत गुंतलेले आहे. निळवंडे धरण व कालव्यांसाठी काहींचे कोणतेही योगदान नसतांना तेच आज उद्घाटन करून श्रेय लाटत आहे.