खांडगाव फाट्याजवळ घडला भीषण अपघात


कार दुभाजकाला धडकून युवक ठार
कारमध्ये घुसला वीजेचा पोल, गाडीचा चुरडा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
भरधाव येणार्‍या कार वरील नियंत्रण सुटल्याने कार चालक युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारचाही चुरडा झाला. हा अपघात काल गुरूवारी रात्री 10 च्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील खांडगाव फाट्याजवळ घडला.मोहन बबन अभंग (वय.23 रा. देवाचा मळा) असे या अपघातात ठार जालेल्या युवकाचे नाव आहे.

या बाबत माहिती अशी की, मयत महेश अभंग हा रात्री जेवन केल्यानंतर एक काम आहे असे सांगून घरातून स्वीफ्ट डिझायर क्र. एमएच43 एएल 0997 घेऊन गेला. नाशिक-पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जात असतांना खांडगाव फाट्याजवळ त्याचा आपल्या वाहानावरील ताबा सुटल्याने ही कार रस्त्यामधील दुभाजकावर जावून जोरात आदळली. यावेळी गाडीचा वेल इतका होता की, रस्त्यामधील वेग इतका होता की, रस्त्यामधील वीजेचा खांब थेट या कारमध्ये घुसला. यात महेश यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबची माहिती शहरात समजताच अनेक तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत महेश अभंग यांचे काही वर्षापुर्वीच लग्न झाले होते. त्याला सहा महिन्यांचा मुलगा आहे. आई-वडिल, पत्नी, मुलगा असा परिवार त्यांच्या पश्‍चात आहे. या अपघाताबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख