संगमनेर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी

पाच जिल्ह्यातून 26 लाखांच्या 51 दुचाकी हस्तगत

दोघे गजाआड, आणखी शोध सुरू

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून संगमनेर पोलिसांचे कौतुक

संगमनेर
संगमनेरात मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत होती. त्या गुन्ह्यांचा शोध लावणे व चोरी गेलेल्या दुचाकी पुन्हा हस्तगत करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. त्यातच या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वावर वाढल्याने व दुसऱ्या जिल्ह्यातील गुन्हेगार येथे येऊन गुन्हे करत असल्याने या चोऱ्यांना आळा बसत नव्हता. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक भगवान मथूरे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस पथकाने पाच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धुमाकूळ घालणार्‍या मोटारसायकल चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून 26 लाख किमतीच्या 51 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. तपास सुरू असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज शहर पोलीस ठाण्यात पत्रकारांना दिली. यावेळी त्यांनी संगमनेर शहर पोलिसांनी केलेली ही धडाकेबाज कारवाई ऐतिहासिक असल्याचे गौरोद्गारही काढत तपासी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


पोलीस अधीक्षक ओला यांनी आज बुधवारी शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस ठाण्याच्या कारभाराची पहाणी करत अधिकारी कर्मचाऱ्यांना सुचना केल्या. तसेच केलेल्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना तपासाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हाभर अशाप्रकारची कारवाई सुरु असताना संगमनेर पोलिसांनी मात्र धडाकेबाज कारवाई करत एतिहासिक कामगिरी केली आहे. शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकींच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून विश्लेषण करुन सुरुवातीला पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्याने अन्य दोघांची नावे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या.

त्या दोघांनाही पोलीस कोठडीत घेवून त्यांनी चोरलेल्या मोटारसायकलची माहिती मिळवताना अनेक धक्कादायक माहिती समोर आल्याचे अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले. अल्पवयीन मुलासह तिघाही आरोपींनी केवळ संगमनेर अथवा अहमदनगर जिल्हाच नाही तर नाशिक, पुणे, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगरसह मध्य प्रदेशमधील सेंधवा येथूनही वेगवेगळ्या दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संगमनेर पोलिसांनी अक्षय सावन तामचीकर (वय 18) व सूरजीत दिलीपसिंग तामचीकर (वय 22, दोघेही रा.भाटनगर, घुलेवाडी ता. संगमनेर) यांना अटक करण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून आत्तापर्यंत 51 मोटारसायकली हस्तगत केल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या दोघांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 18 मोटारसायकल लांबविल्या असून जिल्ह्याभरात 27 दुचाकी चोरल्या आहेत.

याशिवाय सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 22, ओझर व सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन, इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन, सातपूर औद्योगिक वसाहतीतून एक, पुणे जिल्ह्यातील मंचर आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक, विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगावमधून दोन आणि चक्क मध्य प्रदेशातील सेंधवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही एक मोटारसायकल चोरुन आणली आहे.

आत्तापर्यंतच्या चौकशीत त्यांच्याकडून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लंपास केलेल्या 18, संगमनेर तालुका, घारगाव व आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक, राजूर, श्रीरामपूर, कोपरागव, शिर्डी व नेवासा येथून चोरलेली प्रत्येकी एक व अद्यापपर्यंत माहिती समोर न आलेल्या सहा अशा एकूण 51 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. अजूनही त्यांच्याकडून बर्‍याच घटनांची माहिती मिळण्याची शक्यता असून आणखी काही गाड्याही मिळण्याची शक्यता अधिक्षक ओला यांनी व्यक्त केली.
एखाद्या पोलीस ठाण्याच्या तपासात एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची ही बहुधा पहिलीच घटना असल्याचे सांगत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपासी पथकातील प्रभारी उपअधीक्षक संजय सातव, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उप अधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, अमृत आढाव, प्रमोद गाडेकर व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस नाईक फुरकान शेख व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात खमक्या अधिकाऱ्यांविना शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होण्यासह दाखल प्रकरणांचे तपासही ठप्प झाले होते. त्यामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलीन होत असताना शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारनारे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपल्या पथकाकडून ऐतिहासिक कामगिरी करून घेत गुन्ह्याची उकल करण्याबरोबरच पोलिसांची प्रतिमा देखील उंचावल्याने शहरातून पोलीस दलाचे कौतुक होत आहे.

आरोपीतांनी चोरी केलेल्या मोटार सायकल नाशिक ग्रामिण सिन्नर – 22, ओझर – 02, सायखेडा – 02, इगतपुरी – 03, पुणे जिल्हा मंचर आणि चाकण – 04 मो.सा., नाशिक शहरातुन सातपुर – 01, संभाजीनगर(औरंगाबाद) कन्नड – 01, जिल्हा वाशिम मालेगांव – 02, मध्येप्रदेश सेंधवा 01 अशा ठिकाणावरुन 51 मोटार सायकल गुन्ह्याचे तपासात जस्त करण्यात आलेल्या आहेत. मिळुन आलेल्या मोटार सायकलचे वर्णन खालील प्रमाणे,
अ.नं मोटार सायकल मालकाचे नाव चेसी नंबर व इंजीन नंबर मो.सा.चा नंबर मो.सा.चा. प्र मो. सा.गुन्हा दाखल

  1. लक्ष्मण तुकाराम इलग, रा. मुंबई
    फिर्यादी अशोक शिवाजी गरुड MBLHA10EJ89L12259
    HA10EA89L10602 MH.02.BK 5750 स्पेलेंडर संगमनेर शहर पो.स्टे. 846/2022
  2. शहानवाज इकबाल शेख, रा.कुरणरोड, संगमनेर MBLHA10ASCHE15111
    HA10ELCHE17481 MH.17.AS. 4189 स्प्लेंडर प्रो संगमनेर शहर पो.स्टे. 218/2023
  3. मारुती ठका ढवळे, रा. सारोळे पठार MBLHA10ABBHK21032
    HA10EGBHK30377 MH.14.DD. 0085 स्प्लेंडर प्रो संगमनेर शहर पो.स्टे. 911/2022
  4. राजेंद्र महादु बुळकुंडे, रा. संगमनेर MBLHA10ASCHL62141
    HA10ELCHL38953 MH.17.AU.7684 स्प्लेंडर प्रो संगमनेर शहर पो.स्टे. 787/2022
  5. इरफान युन्नुस मोमिन, रा.रहेमतनगर, संगमनेर 07AAWC21313
    07AASM21931 MH.16.AC.0657 ग्लॅमर संगमनेर शहर पो.स्टे. 186/2023
  6. दत्तु गणपत चौधरी, रा.गुरवझाप, ता.अकोले MBLHAR086JHA02206
    HA10EGJHAA1131 MH.17.CC. 0905 स्प्लेंडर प्लस संगमनेर शहर पोस्टे 90/2023
  7. सोमनाथ शिवाजी गायकवाड, रा.वडगावपान, ता.संगमनेर MBLHAR084HHH09430
    HA10AGHHHA8845 MH.17.CA. 6654 स्प्लेंडर प्लस संगमनेर शहर पोस्टे 194/2023
  8. अशिष ओमप्रकाश कलंतरी, रा.नवीननगर रोड, संगमनेर MB2A18AY0HWM18453
    DUVWHM20577 MH.17.BW. 6129 सीटी 100 संगमनेर शहर पो.स्टे.
    236/2023
  9. नाना गोपाळ कासार, रा.मिठसागरे ता.सिन्नर, जि.नाशिक MBLHA10AMFHB63870
    HA10EJFHB15750 MH.15.EY.1857 स्प्लेंडर प्लस संगमनेर शहर पो.स्टे. 51/2022
  10. हरदेवा मेलु हल्ली रा.हरीबाबा मंदिराजवळ, मु रा. जि.नागुर राजस्थान MBLHA11ANF9C01337
    HA11EKF9C00412 RJ.37.SK. 4714 एच.एफ. डीलक्स़ संगमनेर शहर पो.स्टे. 309/2021
  11. वसंत गोविंद मोकळ, रा. घुलेवाडी, ता.संगमनेर MBLHA10BBHK04986
    HA10EGBHK11041 MH.17.AQ. 3017 स्प्लेंडर संगमनेर शहर पो.स्टे. 962/2022
  12. संदीप नवनाथ पगारे, रा.घुलेवाडी, संगमनेर MBLHA11ATF9J27595
    HA11EJF9J09417 MH.17.BJ. 4892 एच.एफ. डीलक्स़ संगमनेर शहर पो.स्टे. 207/2023
  13. भाऊसाहेब दत्तु शिंदे, रा.सुकेवाडी, ता.संगमनेर MBLHA10AMCHM20480
    HA10EJCHM49525 MH.17.AW.2349 स्प्लेंडर प्लस संगमनेर शहर पोस्टे
    236/2023
  14. फिरोज रशिद मनियार, रा.कोतुळ ता.अकोले MBLHA10CGGHC23500
    HA10ERGHC23713 MH.17.BP. 6808 स्प्लेंडर प्लस संगमनेर शहर पो.स्टे. 177/2023
  15. रमेश पाडुरंग सातपुते, रा. घुलेवाडी, ता.संगमनेर मो.नं. MBLHA11ENA9M20499
    HA11ECA9M30532 MH.17.AL.2164 सीडी डीलक्स़ संगमनेर शहर पो.स्टे. 947/2022
  16. रामनाथ गोविंद नवले, रा. मालदाड, संगमनेर MBLHA10EZBHJ57042
    HA10FBHJ53314 MH.17.AP.7542 स्पलेंडर संगमनेर शहर पो.स्टे. 109/2023
  17. राजमोहंमद अबु शेख, रा.नगर रोड, समनापुर, संगमनेर ME4JC65ACJT036800
    JC65ET2059089 MH.17.CC.2226 सीबी शाईन संगमनेर शहर पोस्टे 1023/2022
  18. महादेव पाडुरंग सानप, रा.घुलेवाडी, ता.संगमनेर MBLHA10EEAHG00540
    HA10EAAHG00540 MH.17.AK.3853 स्प्लेंडर संगमनेर शहर पो.स्टे. 672/2022
  19. अजय संपत शेळके, रा.बोटा, ता.संगमनेर MBLHA10AMDHH01338
    HA10EJDHH14031 MH.17.BA. 2169 स्प्लेंडर प्लस घारगाव पो.स्टे. 80/2023
  20. गोरक्षनाथ रंगानाथ पाटोळे, रा.देवठान ता. अकोले MBLHA10ALCHH84849
    JA10EJCHH33486 MH.17.AT. 3526 स्प्लेंडर स्ल़स आश्वी पो.स्टे. 57/2023
  21. भाऊसाहेब निवृत्ती कोकणे, रा.झापवाडी औरंगपुर रुंभोडी अकोले MBLHA10AMCHG63582
    HA10EJCHG56521 MH.17.BK.5136 स्प्लेंडर प्लस राजुर पो स्टे 210/2022
  22. किरण किसन इंगळे, रा.श्रीरामपुर MBLHA11ALF9A41002
    HA11EJF9A34539 MH.17.BH.3053 एच एफ डीलक्स़ श्रीरामपुर शहर पो.स्टे. 950/2022
  23. संजय चांगदेव दहे, रा.दाउच कोपरगाव, MBLHA10EZBHH19330
    HA10EFBHH17591 MH.17.AQ.1808 स्प्लेंडर प्लस कोपरगाव तालुका पो.स्टे 335/2022
  24. अंबादास पुंजाबा फटांगरे, रा. कोकमठाण कोपरगाव MBLHA10AMDHK84415
    HA10EJDHK74385 MH.17.AY. 9833 स्प्लेंडर प्लस शिर्डी पो.स्टे. 295/2022
  25. सत्येंद्र कैलास राठोड, रा.शिर्डी ता.राहता MBLHAR080HHH15404
    HA10AGHHHF2203 MH.17.CA. 9098 स्प्लेंडर स्ल़स शिर्डी पो.स्टे. 395/022
  26. दिगंबर भाऊसाहेब पिसाळ, रा.हांडीनिमगाव, ता.नेवासा MBLHAR081HHG12654
    HA10AGHHGB2940 MH.17.CB.4575 स्प्लेंडर प्लस नेवासा पो.स्टे. 1109/2022
  27. तन्वीर कुय्युम आत्तार, रा. देवळाली नाशिक MBLHA10ADA9M24989
    HA10EHA9M27775 MH.15.CY. 5492 स्प्लेंडर प्रो नाशिक रोड पो.स्टे. 208/2022
  28. शोभा विष्णु जंत्रे, रा.नाशिक MBLHA10EZAHL58923
    HA10RFAHL93095 MH.15.CH. 3468 स्प्लेंडर प्लस देवळाली कॅम्प पेा.स्टे. 42/2015
  29. संदिप बाबुराव कचरे, रा.पिंपळगाव गरुडेश्वर, नाशिक MBLHAR088JHH31923
    HA10AGJHHB3121 MH.15.GS. 9684 स्प्लेंडर प्लस एमआयडीसी सिन्नर 28/2022
  30. श्रध्दा विजय सुर्यवंशी, रा.कहांडळवाडी ता.सिन्नर नाशिक ME4JF39EHHU032855
    JF39EU2143787 MH.17.CC.1875 डीओ वावी पोलीस स्टेशन 240/2022
  31. अशोक लक्ष्मण डुबे, रा.पेमगीरी ता.संगमनेर MBLHA10EE9HK51772
    HA10EA9HK41126 MH.17.AC. 6493 स्प्लेंडर प्लस संगमनेर तालुका पो.स्टे. 171/2023
  32. विठोबा सुनिल नाथे, रा.गोंदेदुमाला,ता.इगतपुरी, जि.नाशिक MBLHAR070HHC70072
    HA10AGHHCA2998 MH-15-GB-3455
    स्प्लेंडर प्लस
  33. किसन केरु शेळके, रा. नोंदुर शिंगोटे सिन्नर MBLHA10EEAHE34427
    MA10EAAHE38011 MH.15.CR.1643 स्प्लेंडर प्लस
  34. संजय बन्सी भालेराव, रा.निपानी ता.निफाड, जि.नाशिक MBLHA10BFFHB63545
    HA10ERFHB03450 MH.15.EY.5721 स्प्लेंडर प्रो
  35. प्रदिप जयसिंग जाधव रा. कल्याण ठाणे MBLHAR1875HH70291
    HA10ACJHH40407 MH.05.DW1011 पॅशन प्रो
  36. एकनाथ रघुनाथ काकड, रा.देवठाण ता.अकोले MBLHA10EJ9HL16329
    HA10EA9HL66403 MH.17.AC. 7838 स्प्लेंडर प्लस
  37. देवराम लहुजी बिन्नर, रा.आडवाडी, सिन्नर, नाशिक MBLHA10EE8HM05750
    HA10EA8HM11151 MH.15.CF. 9257 स्प्लेंडर प्लस
  38. पोपट गणपत बिन्नर, रा.मराठी शाळा परीषद पिंपळे, ता.सिन्नर, जि.नाशिक MBLHA10ASD9J06617
    HA10ELD9J07856 MH.15.EC.7562 स्प्लेंडर प्रो
  39. सदाशीव शंकर रेवगाडे, रा.झापवाडी, ता.सिन्नर, नाशिक MBLHA10ACB9K00278
    HA10EHB9K01449 MH.15.DF. 0832 स्प्लेंडर प्रो
  40. सुर्यभान बस्तीराम वाघ, रा.भंडारदारा, जवळके, ता.कोपरगाव MHLHA10EYBHL67042
    HA10EFBHL68944 MH.17.AR. 0489 स्प्लेंडर स्ल़स
  41. शंकर जयराम रायकर, रा.धामनी इगतपुरी, नाशिक MBLHA10EZBHD13914
    HA10EFBHD14983 MH.15.DA. 6021 स्प्लेंडर स्ल़स
  42. अनिल श्रावण देवकर, रा.गुलवंच ता.सिन्नर नाशिक MBLHAR202H9A01257
    HA11ENH9A01809 MH.15.FX. 8268 एच.एफ. डीलक्स़
  43. पांडुरंग प्रल्हाद मतांगी, रा.सिध्दार्थनगर एकलहार कॉलनी, नाशिक MBLHA11ATG9J56230
    HA11EJG9J20694 MH.15.FP. 8054 एच.एफ. डीलक्स़
  44. दौलत रखमा आंधळे, रा.खंबाळे, ता.सिन्नर MBLHA10A3EHG73208
    HA10ELEHG09570 MH.15.ER.5745 स्प्लेंडर
  45. रोशन उल्हास कदम रा. दत्तवाडी, विठ्ठलपार्वती निवास, पुणे MD2A57AZ1EWH02129
    PAZWEH02657 MH.12.LS.4961 डिस्कव्हर
  46. निरंक 00M20C15379
    00M18M15610 निरंक स्पेलेंडर .
  47. निरंक खोडलेला आहे.
    HA10EA8GJ01698 निरंक स्प्लेंडर प्लस
  48. निरंक 07A16C28522
    07A15M27180 निरंक स्प्लेंडर
  49. निरंक 95C19F00959
    95C17E01006 निरंक स्प्लेंडर
  50. निरंक MBLHA10ASHO75002
    नंबर दिसत नाही निरंक स्प्लेंडर
  51. निरंक 03A20F06648
    नंबर दिसत नाही निरंक स्प्लेंडर
    येणे प्रमाणे वरील वर्णनाच्या मोटार सायकल संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 218/2023 भा.द.वि.कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख