बंदी असलेल्या गुटख्याची संगमनेरात चढ्या भावाने जोरदार विक्री

बंदी असलेल्या गुटख्याची संगमनेर शहरासह तालुक्यात महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
शासनाने भावी पिढीच्या व्यसनमुक्तीसाठी गुटखा बंदी जाहीर करून आपल्या कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडले. मात्र संगमनेर शहरामध्ये छोट्या-मोठ्या पान टपर्‍यांसह किराणा दुकानात सर्रासपणे हा बंदी असलेला गुटखा विकला जातो. आणि तोही चढ्या भावाने. राज्यात बंदी असलेला हा गुटखा संगमनेरात खुलेआम पणे कसा येतो ? सर्वच दुकानात तो कसा मिळतो? या गुटखा विक्रीला कोणाचा आशीर्वाद आहे हे आता लपून राहिलेले नाही. अन्न व औषध प्रशासनासह, पोलीस आणि शासनाच्या अनेक बड्या हस्तींचा साथ असल्याशिवाय हा गोरख धंदा चालू शकत नाही. दोन रूपयांना मिळणारा गुटखा आता संबधित विभागाच्या थातूरमातूर कारवाईमुळे व स्वताचे भले करण्याच्या नादात सात ते नऊ रूपयांना मिळत आहे.


राज्यात गुटखा बंदी असतांना व याच्या अमलबजावणीसाठी स्वतंत्र विभाग असतानाही यावर नियंत्रण ठेवता आले नाही. अन्न व औषध प्रशासनाकडे ही जबाबदारी असताना अनेक वेळा पोलीस परस्पर कारवाई करतात मात्र त्यानंतर गुटखा बंद होण्याऐवजी त्याचे भाव वाढविले जातात. तडजोडीनंतर गुटखा सुरू रहातो आणि वाढलेले भाव मात्र कायम राहतात. बंदी असलेल्या गुटख्याची संगमनेर शहरासह तालुक्यात महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. आणि ही उलाढाल संबंधित विभागाच्या मर्जीविरुद्ध होऊ शकत नाही. संगमनेर शहरामध्ये सात ते आठ जण अवैद्य बंदी असलेला गुटखा, पान मसाला, मावा इत्यादीचे होलसेल व्यापारी आहेत. आणि त्यांचे पूर्ण तालुक्यात जाळे पसरलेले आहे. तालुक्यातील पठार भागातील काही ठिकाणी गुटख्याचे गोडाऊन असून तेथून हा माल प्रवासी रिक्षा, मोटारसायकलींच्या साह्याने इतरत्र वितरित केला जातो. अन्न व औषध प्रशासनाला देखील हे माहित असून देखील याबाबत कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने या पाठीमागे मोठे आर्थिक लागेबांधे असल्याचे समजते. हे लागेबांधे शासनाच्या धोरणाला हारताळ फासणारे असून भावी पिढी उध्वस्त करण्यासाठी पोषक काम संबंधित विभाग करतो की काय अशी शंका येते.

राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा केला, गुटखा बंदी कायदा केला, मटका बंदी, जुगार बंदी कायदा केला. परंतु हे कायदे संगमनेरला लागू होत नाही का? असा प्रश्‍न येथील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. शहर पोलीस ठाण्यात नवीन पोलीस निरीक्षक दाखल झाले असून सुरवातीला त्यांनी आपला धाक निर्माण करण्याचा चांगला प्रयत्न केला. परंतु गेल्या काही दिवसात शहरात वाढले अवैध धंदे पहाता व बंद पडलेले कत्तलखाने सुरू झालेले पाहिल्यावर तसेच वाढलेल्या चोर्‍या पहाता त्यांचा हा धाक फुसका बार ठरल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख