जागतिक महिला दिनानिमित्त विश्वगंध आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबीर

0
1794

महिलांच्या आजारांची होणार मोफत तपासणी व उपचार


युववार्ता (Oप्रतिनिधी0संगमनेर
आयुर्वेदिक शास्त्रात संपूर्ण राज्यभर नावलौकिक असलेल्या शहरातील नवीन नगर रोड येथील श्री विश्वगंध आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी मोफत तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती हाॅस्पिटलचे संचालक वैद्य स्मिता अतुल देशमुख यांनी दिली.

आजकाल महिला सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. परंतु त्यांचे त्यांच्या आरोग्याकडे काहिसे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. 8 मार्च हा जागतिक आरोग्य दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आपली सामाजिक जबाबदारी म्हणून येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य अतुल देशमुख व वैद्य सौ. स्मिता देशमुख यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्रीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित केले आहे.


या शिबिरात महिलांच्या पाळीच्या तक्रारी, अंगावरून जास्त किंवा कमी जाणे, अनियमित पाळीचा त्रास, पाळी न येणे, गाठ तयार होणे, पाळीत जास्त दुखणे, अंगावरून सफेद जाणे, मायांगाला खाज येणे, वंध्यत्व, स्री बीज तयार न होणे, स्री बिजाची वाढ न होणे, गर्भपिशविला सुज येणे, गर्भपिशविला जखम होणे यासह महिलांच्या अनेक आजाराची या शिबिरात तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी 9850149962,9960841968 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वैद्य सौ. स्मिता अतुल वैद्य यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here