देशमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे दातृत्व

0
1943
हॉस्पिटलचे दातृत्व

चार वर्षाच्या चिमुकल्याला मिळाली दृष्टी

डॉ. निलेश देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

दोन्ही डोळ्यांना होता मोतीबिंदू, किचकट शस्रक्रिया मोफत व यशस्वी करून समाजापुढे ठेवला आदर्श

किचकट शस्रक्रिया मोफत व यशस्वी करून समाजापुढे ठेवला आदर्श
युवावार्ता(प्रतिनिधी) – संगमनेर – वडील दुसर्‍याच्या गाडीवर चालक, आई मोलमजुरी करीत कुटूंबाचा उदनिर्वाह करते. अशा परिस्थित त्यांच्या चार वर्षाचा युवराजच्या दोन्ही डोळ्यात मोतिबिंदु झाला. अनेक मोठ-मोठ्या रूग्णालयात, शिर्डीच्या साई रूग्णालयात, पुण्यातही अनेक ठिकाणी उपचार केले, परंतू फरक पडला नाही. शस्त्रकी्रया करण्यासाठी मोठ्य रकमेची मागणी झाली परंतू. घरात आठराविश्‍व गरीबी असणार्‍या या कुटूंबाला सर्वांनी नाकारले. मात्र संगमनेर येथील देशमुख मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक नेत्र तज्ञ डॉ. निलेश देशमुख व डॉ . तेजस्वीनी देशमुख यांनी सामाजिक दातृत्वातून या चिमुकल्यावर मोफत व रक्त कमी असतांनाही धोका पत्करून यशस्वी उपचार केले. या अवघड व यशस्वी शस्त्रक्रीयेमुळे युवराजला आता नवीन दृष्टी मिळाल्याने त्याच्या व त्याच्या कुटूंबाच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.


पुणे येथील धायरी वडगाव येथे जनार्दन पगार आपल्या कुटूंबासह मोलमजूरी करून राहात होते. त्यांच्या बालवाडीत जाणार्‍या युवराजची दृष्टी हळुहळु कमी होत होती. एक दिवस शाळेत आरोग्य तपासणीत डॉक्टरांना शंका आली म्हणून त्यांनी युवराजच्या पालकांना नेत्ररोग तज्ञांकडे पाठविले. या नेत्ररोग तज्ञाने दिलेल्या माहितीमुळे युवराजच्या आईवडीलांच्या पायाखालची जमीन हादरली. अवघ्या चार वर्षाच्या युवराजच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदु झाला होता. आता या बाबत पुढील उपचारासाठी त्याना पुणे, प्रवरानगर, शिर्डी, येथील मोठ-मोठ्या रूग्णालयात तपासणी केली. परंतू युवराजचे रक्ताचे प्रमाण अवघे 4 ते 5 असल्याने तसेच या शस्त्रक्रीयेसाठी 40 ते 50 हजार खर्च येणार असल्याने आता करायचे काय? असा प्रश्‍न युवराजच्या आईवडीलांना पडला आणि एका नातेवाईकाच्या माध्यमातून यांना संगमनेर येथील डॉ. निलेश देशमुख यांचा संपर्क मिळाला.


डॉ. देशमुख यांनी युवराजची सर्व तपासणी केली, आई-वडीलांची आर्थिक परिस्थिती पाहिली आणि या युवराजची मोफत शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय केला. रक्त कमी असल्याने धोका होता परंतु भुलतज्ञ डॉ. किशोर गाढवे यांनी यशाची कामगिरी केली. डॉ. देशमुख यांनी फेको सर्जरी (जर्मन मशिनद्वारे) इमर्पोटेड लेन्स वापरून हि शस्त्रक्रीया यशश्‍वी केली. डॉ. देशमुख यांनी रूग्णाप्रती दाखविलेली आस्था, सामाजिक जाणीव यामुळे अवघ्या काही रूपयात युवराजला नविन दृष्टी मिळाली आहे. याबद्दल डॉ. देशमुख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here