अभियांत्रिकी अधिकारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी हरिभाऊ गिते यांची फेरनिवड

0
1490

सामाजिक कार्य करण्यावर आणखी भर देऊ – गिते


नाशिक
सरळसेवा प्रविष्ठ वर्ग १ अभियांत्रिकी अधिकारी संघटना महाराष्ट राज्य यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नांशिक येथे दि ७ ॲाक्टोबर २०२३ रोजी पार पडली. यावेळी सन २०२३-२५ या वर्षाच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. अभियंता हरिभाऊ गिते, प्रादेशिक जलसंधारण अघिकारी यांची राज्य अध्यक्ष म्हणुन फेरनिवड करण्यात आली आहे. यावेळी मंहेद्र नाकील अधिक्षक अभियंता जलंसपदा व किशोर पाटील अधिक्षक अभियंता सार्वजनिक बाधकाम विभाग प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.


राज्याच्या जडणगडीत अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे. अंभियंतानी समाजउपयोगी व वेळेत कामे पुर्ण करावे असे आवाहन प्रमुख पाहुणे किशोर पाटील यांनी केले. तर मंहेद्र नाकील यांनी या वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला असल्याने पाण्याचा वापर योग्य करुन योग्य नियोजन करावे असे सांगितले. अध्यक्ष म्हणुन हरिभाऊ गिते यांनी संघटनेच्या वतीने सामाजिक कार्य करण्यावर आणखी भर दिला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी शासनाच्या कंत्राटी भरतीला संघटना स्तरावर विरोध करण्यात आला. अभियंत्यांनी आपली प्रतिमा जपावी व दर्जेदार कामे करावी अशा सुचना यावेळी करण्यात आल्या. तसेच जंलसंपदा व सार्वजनिक विभागाचे मंहामंडळावर भारतीय सेवेतील अधिकारी यांची व्यस्थापकीय संचालक म्हणुन नेमणुक बाबत ठराव संघटनेच्या बैठकीत करण्यात आला.
झालेल्या या बैठकीत संघटनेची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे
अध्यक्ष- हरिभाऊ गिते, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, सरचिटणीस- संदिप पडांगळे, कार्यकारी अभियता सार्वजनिक बाधकाम विभाग,
कोष्याध्यक्ष – प्रविण पाबळे, कार्यकारी अभियता जंलसंपदा विभाग,
मार्गदर्शक- मंहेद्र नाकील, अधिक्षक अभियता सेवानिवृत जंलसंपदा विभाग,
उपाध्यक्ष – देवेंद्र सरोदे, यंशवत पाटील, बोरकर राजेद्र, मनोज नाईक, अमरसिंह पाटील, श्रीमती अनिता पराते,
सहसचिव- सुनिल पाटील, विनोद पाटील, बाळु सानप, अभिजीत नितनकरे, सुजित काटकरे, केतन पवार.
संघटन सचिव- मुकेश ठाकुर, विवेक लव्हाट, सुरज शिंदे,
महिला प्रतिनिधी- श्रीमती सविता भंडारी, ललिता गौरीगिरीबुवा, प्रांजली टोंगसे, रंजनी पाटील, योगिता जोशी, स्वाती ठेले, किर्ती पाटील.
जनसंवाद सचिव- दिलीप काळे, सुमित पाटील, अमोल पंडीत यांची निवड करण्यात आली.

या वार्षिक सभेकरिता राज्यातुन जंलसंपदा विभाग, सार्वजनिक बाधकाम विभाग, मृद व जलसंधारण विभाग मधुन शेकडो अभियंता उपस्थित होते. नुतन अध्यक्ष व पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here