डॉ. संजय विखे, अमर नाईकवाडी, करण राजपाल, कपिल चांडक,आदित्य राठी, प्रतिक सुपेकर, वेणुगोपाल लाहोटी आयर्नमॅन
संगमनेर (विशेष प्रतिनिधी) – नुकतेच गोवा येथे झालेल्या गोवा आयर्नमॅन 70.3 या स्पर्धेमध्ये संगमनेर येथील डॉ. संजय विखे, उद्योजक अमर नाईकवाडी, करण राजपाल, कपिल चांडक, आदित्य राठी, प्रतिक सुपेकर, वेणुगोपाल लाहोटी यांनी सहभाग नोंदविला आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. याआधी जय मनिष मालपाणी यांनी स्पेन येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्यामुळे संगमनेरमधील एकूण आठ स्पर्धकांनी यावेळी आयर्नमॅन स्पर्धेत यश संपादन केले आहे.
डॉ. संजय विखे, उद्योजक अमर नाईकवाडी, करण राजपाल यांनी मागील वर्षीही आयर्नमॅन स्पर्धेत यश संपादन केले होते. डॉ. संजय विखे यांनी ४९-४९ वर्षे वयोगटामध्ये ५ वा क्रमांक पटकाविला असून न्यूझिलंड येथे 2024 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.
गोवा येथे झालेल्या या स्पर्धेचे स्वरूप १.९ किमी पोहणे (१ लॅप), ९० किमी सायकलिंग (३ लॅप), २१ किमी धावणे (३ लॅप) असे होते. गेल्या एक वर्षांपासून हे आठही स्पर्धक या स्पर्धांसाठी तयारी करत होते. अथक परिश्रमातून त्यांनी हे यश संपादन केले आहे. या सर्व स्पर्धकांनी ५ ते ८ तासांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली आहे.