गोल्ड व्हॅल्यूअरने अनेकांना घातला गंडा

गोल्ड व्हॅल्यूअर

कर्ज न घेता कर्ज फेडण्याची ग्राहकांवर आली वेळ
युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर – बँकांनी ज्या सोनारांवर गोल्ड लोनसाठी सोने तपासून घेऊन त्याची गुणवत्ता व किमंत ठरविण्याची जबाबदारी दिली त्यांनीच बँकेच्या काही कर्मचार्‍यांना हाताशी धरून बनावट सोन्यातून बँकेला लाखो रूपयांचा चुना लावला. तसेच ओळखीचा गैर फायदा घेऊन गरीब, कष्टकर्‍यांच्या नावावर बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज उचलले. गेल्या 4-5 वर्षांपासून सुरू असलेल्या या गैर प्रकरणात अनेक निरपराध कुटुंबे माणुसकीमुळे विनाकारण कर्जाच्या खाईत लोटली गेली आहेत. सोने बनावट असल्याची आत्ता मिळालेली माहिती व कर्जाच्या वसुलीसाठी सुरू झालेल्या तगाद्यामुळे कर्जदार हवालदिल झाले आहे. न केलेल्या अपराधाच्या कारवाईची टांगती तलवार त्यांच्या मानेवर असल्याने त्यांना मानसिक धक्का बसल्याने ज्यांनी अपराध केला आहे. त्यांना सजा द्या आम्हाला नाहक त्रास का? असा सवाल आता हे पिडीत नागरिक करत आहे.


अनेक बँकेत बनावट सोने तारण ठेवून कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी गोल्ड व्हॅल्यूअरसह अनेक जणांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गोल्ड व्हॅल्यूअरने आपल्या ओळखीचा फायदा घेत सामान्य कुटुंबातील हातावर पोट असलेल्या व्यक्तींच्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावावर गोल्ड लोन केले. त्याबदल्यात काहींना थोडीफार रक्कम देखील देण्यात आली. दरम्यान त्यासाठी खाते उघडण्यापासून कर्जाच्या व्याजाचे हप्ते भरणे, दरवर्षी नूतनीकरण करणे ही सर्व कामे संबंधित गोल्ड व्हॅल्यूअर स्वतःच करीत असल्याने यातील सोने बनावट असल्याची कोणतीही माहिती कर्जदारांना नव्हती. बनावट सोनेतारण प्रकरण बाहेरून आलेल्या व्हॅल्यूअरमुळे उघडकीस आले. त्यानंतर संबंधित बँकांनी या खातेदारांना फोनवरून कर्जाची परतफेड करण्याची मागणी सुरू केली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने, अनेकांना मानसिक धक्का बसला आहे. एक रुपयाचाही लाभ न मिळता काहींचा विश्‍वासघात झाल्याचे उघड झाले आहे.


या सर्व प्रकरणात सोने तारणाची प्रक्रिया करणारा, प्रत्यक्ष कर्जाची रक्कम वापरणारा गोल्ड व्हॅल्युअर व संबधित बँकांमधील अधिकारी व कर्मचार्‍यांचे संगनमत असल्याचा आरोप कर्जदारांनी केला आहे. यात गवंडी, चालक, रोजंदारीवर काम करणारे, तुटपुंज्या उत्पन्न गटातील कुटूंबे तसेच काही महाविद्यालयीन युवक, युवती व महिलांचाही समावेश असून, नावावरील बनावट आपल्या सोने प्रकरणात गुन्हा दाखल होण्याच्या व करिअर पणाला लागण्याच्या भीतीने ते सैरभैर झाले आहेत. तर काहींनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी व उच्च न्यायालयाकडे तक्रार अर्ज पाठवून न्यायाची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख