शेतकऱ्यांचे बीज कनेक्शन कट करू नका
संगमनेरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडीचा मोर्चा व धरणे आंदोलन
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येत असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे .मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटी कडे लक्ष देणाऱ्या या सरकारचे शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करू नये अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
संगमनेर मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन झाले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, सौ दुर्गाताई तांबे ,कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात , ॲड. माधवराव कानवडे , इंद्रजीत भाऊ थोरात, बाबासाहेब ओहोळ ,मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, कपिल पवार, शिवसेनेचे अमर कातारी, नवनाथ आरगडे, सौ निर्मलाताई गुंजाळ, सुनंदाताई जोर्वेकर ,सौ मीराताई शेटे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की ,कांद्याचा प्रश्न सध्या मोठा अवघड झाला आहे. दुष्काळी भागातील शेतकरी मोठ्या खर्चातून कांदा पीक उभारतो .मात्र कमी भाव झाल्याने हे सर्व शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. या अडचणीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे .महाविकास आघाडी सरकार व आघाडी सरकारने कायम शेतकऱ्यांना मदत केली आहे .मात्र सध्याचे सरकार फक्त मेट्रोसिटी आणि मेट्रोवर भर देत असून शेतकऱ्याकडे दुय्यम भावनेतून पहात आहे. कांद्याचे उत्पादन जास्त झाले असून नाफेड कडून कुठेही खरेदी सुरू नाही .कापूस ,सोयाबीन, भाजीपाला ,वांगे, कांदे सर्व पिकांचे भाव पडले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त भाव दिला पाहिजे .
याचबरोबर सध्या उन्हाळा वाढत असून सरकारकडून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहेत. महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस होते त्यावेळी हेच भाजपवाले मोफत विजेच्या घोषणा देत होते. आता मोफत वीज करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. राज्यातील जनता ही शिंदे फडणवीस सरकारला कंटाळली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसब्यातून बदलाचे वारे सुरू झाले आहे 2024 मध्ये संपूर्ण बदल आपल्याला पाहायला मिळेल तसेच जिल्ह्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्याऐवजी काही मंडळी जिरवा जिरवीचे राजकारण करत आहे . हे अत्यंत चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेतही आपण आवाज उठवू विधानसभेतील आवाज आणि जनतेचा रस्त्यावरील एकत्र मिळून सरकारला चांगले निर्णय घ्यायला भाग पाडू असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.
तर आ डॉ तांबे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्याची अत्यंत वाईट अवस्था असताना श्रीमंताच्या हिताचे निर्णय भाजप सरकारकडून घेतले जात आहे. कांदा हा नगदी पीक आहे. मात्र कांदा आयातीचे धोरण सरकार घेतले आहे. गहू, साखर आयात करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. कांदा हे शाश्वत पीक असल्याने अनेक शेतकरी कांदा उत्पादन करत असतात. ज्यावेळी कांदा उत्पादन जास्त होते त्यावर प्रक्रिया उद्योग सुरू करा. विजेचा धोरण निश्चित करा. दिवसा 12 तास वीज द्या अशी मागणी ही आमदार तांबे यांनी केली तर यावेळी सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, माधवराव कानवडे ,रामहरी कातोरे ,नवनाथ आरगडे, सिताराम राऊत ,मिलिंद कानवडे, शिवाजी जगताप, निर्मलाताई गुंजाळ, बाबले महाराज, जावेद शेख ,माजी सैनिक रायभान पवार, विष्णुपंत रहाटळ या शेतकऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या . यावेळी सुरेश थोरात,ह भ प नवनाथ महाराज आंधळे ,आनंद वरपे, सुभाष सांगळे ,सौ उगलमुगले ,संतोष हासे, रामदास वाघ ,प्रा बाबा खरात, निखिल पापडेजा ,आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी कांद्याला हमीभाव द्या, शिंदे सरकारचा निषेध असो अशा विविध घोषणांनी संगमनेर बसस्थानक परिसर दुमदुमून गेला यानंतर शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अधिकाऱ्यांनी जनतेच्या हिताची कामे करा
सत्ता येते आणि जाते मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या काही लोकांकडून जिरवा जिरवीचे राजकारण सुरू आहे. गरीब आणि निरपराधांना त्रास देऊ नका .अधिकाऱ्यांनी न्याय भूमिकेने वागा. जिरवा जिरवीचे राजकारण करणाऱ्यांची जनताच जिरवेल असेही असा टोलाही आमदार थोरात यांनी लगावला..
राज्यासाठी अनुकरणीय पॅटर्न
रास्ता रोको हा शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी आहे. मात्र सरकारची लक्ष वेधण्यासाठी सर्वसामान्य जनतेला त्रास नको म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांनी रास्ता रोको करणे ऐवजी धरणे आंदोलन करून आपल्या भूमिका मांडावी अशी सूचना कार्यकर्त्यांना दिल्याने लोकांना वेठीस न धरता लोकशाही व न्याय पद्धतीने आपल्या मागण्या मांडण्याची ही पद्धत नक्कीच राज्यासाठी अनुकरणीय ठरणार आहे..