समर्थ फर्निचर मॉलच्या वतीने मोफत भाग्यवान ग्राहक सोडत

0
1338

अल्पावधीतच मॉल ग्राहकांच्या पसंतीस

युवावार्ता (प्रतिनिधी)-
संगमनेर – वाल्मिक चौधरी यांनी आपल्या व्यवसायात मूल्यांची जपणूक केली आहे. त्यांनी सतत देण्याची वृत्ती जोपासली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक अविनाश कुदळे यांनी केले. ते समर्थ फर्निचर अँड मॉलच्या वतीने ग्राहकांसाठीच्या आयोजित मोफत भ्राग्यवान ग्राहक सोडत योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
संगमनेर आणि अकोले तालुक्यातील समर्थ फर्निचर अँड मॉल यांच्यावतीने या वर्षीच्या मोफत फर्निचर बस्ता सोडतीचा मानकरी विलास भागोजी गावडे तर दीपावली व दसरा ऑफरचे मानकरी सादिक अली मनियार हे दोघे भाग्यवंत विजेते ठरले असल्याची माहिती समर्थ फर्निचर अँड मॉलचे प्रमुख वाल्मिक चौधरी यांनी दिली.
संगमनेर व अकोले या दोन ठिकाणी समर्थ फर्निचर अँड मॉल हे शोरूम गेली सहा वर्षापासून सुरू केले आहे. या मॉलमध्ये अनेक नामांकीत कंपनीचे फर्निचर तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. अल्पावधीतच हा मॉल ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आहे. दरवर्षी फर्निचर
बस्ता व दीपावली दसरा या सणाच्या निमित्ताने फर्निचर खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी नाविन्य पूर्ण उपक्रम राबवित असतात. याहीवर्षी दीपावली दसरा तसेच फर्निचर बस्ता हा अभिनव उपक्रम समर्थ फर्निचर अँड मॉलच्यावतीने दोन्ही शाखेत राबविण्यात आला होता.


दरवर्षाप्रमाणे याही वर्षी राबविलेल्या फ्री फर्निचर बस्ता या उपक्रमामध्ये 300 पेक्षा अधिक ग्राहकांनी सहभाग घेतला होता. या योजनेच्या सोडतीमध्ये अकोले तालुक्यातील विलास भागुजी गावडे या भाग्यवंत विजेत्यांची चिठ्ठी निघाली त्यामुळे त्यांना फर्निचर बस्ता खरेदी एवढ्या रक्कमेचा धनादेश तसेच दीपावली दसरा निमित्ताने फ्री बेडरूम सेट देण्यात आला. या योजनेत 500 पेक्षा अधिक ग्राहकांनी सहभाग घेतला होता. भाग्यवान ग्राहकाना मोठा बेड रूम सेट उद्योजक अविनाश कुदळे, पत्रकार संदीप वाकचौरे, गोरक्षनाथ मदने, ज्ञानराज उद्योग समूहाचे संचालक धनंजय आहेर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी समर्थ फर्निचर अँड मॉलचे संचालक वाल्मिक चौधरी, गणेश चौधरी इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here