चार दुचाकी चोर जेरबंद, सात दुचाकी हस्तगत

दुचाकी चोर जेरबंद


संगमनेर, सिन्नर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस


पो. नि. भगवान मथुरे यांची धडाकेबाज कारवाई


आरोपित अल्पवयीन मुलाचा समावेश

युवावर्ता (प्रतिनिधी) संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. वाहतुकीला शिस्त, अवैध धंदे आणि वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून मोटार सायकल चोरीतील चार आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच त्यांच्याकडून 3,50,000/- रुपये किंमतीच्या संगमनेर शहर व सिन्नर येथील 07 मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. संगमनेर उपविभागात चोरीतील गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम यांनी संजय सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग व भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांना दिले. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी उपविभागातील भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोना. आण्णासाहेब दातीर, पोना. फुरकान शेख नेमणूक सायबर सेल अप.पो.अधि. कार्यालय, श्रीरामपुर, पोका अमृत आढाव, पोकों सुभाष बोडखे, पोकाॅ. प्रमोद गाडेकर, सर्व नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, संगमनेर यांचे तपास पथक तयार करुन त्यांना आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या.


फियांदी ओम दिपक जानमाळी, रा. बुधवार पेठ, नाशिक हल्ली रा. गणेशनगर, संगमनेर यांनी दिनांक 02/02/2023 रोजी फिर्याद दिली होती. दि.31/01/2023 रात्री 12/15 ते सकाळी 08-00 वा. दरम्यान गणेशनगर, संगमनेर येथून त्यांची एक हीरो हॉन्डा कंपनीची काळ्या रंगाची सीडी डिलीक्स नं. एम. एच. 17. यु.8614 इंजिन नं. 06C29F01637 मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 104 / 2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर मोटार सायकलच्या तपासात विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवून विचारपुस करता त्यांने सदरची मोटार सायकल चोरीची कबुली दिली असुन मोबीन मुबारक शेख, वय 23 वर्ष, महंमद फरदिन नाजिर शेख, वय 21 वर्षे, दोन्ही रा. रेहमतनगर, संगमनेर यांना विक्री केली असल्याचे सांगितले. त्यावरून त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन सदर मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. सदर विधीसंघर्षीत बालक व वरील आरोपी यांना विश्वासात घेवून विचारपूस करत विधीसंघर्षीत बालक याने सिन्नर, जि. नाशिक येथुन चोरी केलेल्या 04 मोटार सायकल आरोपी 1) मोबीन मुबारक शेख व 2) महंमद फरदिन नाजिर शेख यांनी विक्री केल्याचे सांगितले. त्यांच्याकडुन सदर चारही मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.


तसेच फिर्यादी किरण रोहिदास राहाणे, रा. चंदनापुरी ता. संगमनेर यांनी दिनांक 10/03/2023 रोजी फिर्याद दिली की, दि. 08/03/ 2023 दुपारी 02-30 ते 02-45 वा चे दरम्यान रायतेवाडी फाटा, हॉटेल संकेत येथुन त्यांचे मालकीची हीरो एलेंन्डर प्रो. मो.सा. क्रं. एम.एच. 17.ए.यु.3183 चेसी नं. MBLHAIOASC9H02525 ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 187/2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर बाबत विधीसंघर्षीत बालक याच्याकडे विचारपुस करता त्याने सदर मोटार सायकल निमगाव टेंभी, ता. संगमनेर येथील सुमित संजय कदम याचे सोबत चोरी केलेली असुन ती 1) मोबीन मुबारक शेख व 2) महंमद फरदिन नाजिर शेख यांचे मार्फतीने विक्री केली असल्याचे सांगितल्याने ती देखील हस्तगत करण्यात आली आहे.


सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर, संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर यांचे मार्गदर्शनाखाली भगवान मथुरे पोलीस निरीक्षक संगमनेर शहर पोलीस स्टेशन, पोहेकॉ अमित महाजन, पोना दत्तू चौधरी नमे संगमनेर शहर पोलीस स्टेशन, पोना फुरकान शेख ने सायबर सेल अप.पो.अधि. कार्यालय, श्रीरामपुर, पोना. आण्णासाहेब दातीर, पोका. अमृत आढाव, पोकों/ सुभाष बोडखे, पोकों/ प्रमोद गाडेकर सर्व नेम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, संगमनेर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख