काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थाेरात यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
नागपूर हिवाळी अधिवेशनात मदत जाहीर
बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला निघालेल्या शिर्डी येथील वारकऱ्यांच्या दिंडीत 3 डिसेंबर रोजी नाशिक पुणे महामार्गावर भरधाव कंटेनर घुसल्याने अपघात झाला. यामध्ये चार वारकरी मृत्युमुखी पडले तर दहाहून अधिक वारकरी जखमी झाले. आमदार थाेरात स्वतः त्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते, अत्यंत गरीब कुटुंबातील हे वारकरी आहेत, मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी थाेरातांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाशी संपर्क केला मात्र अद्याप पर्यंत ती मदत मिळालेली नव्हती. मृत पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यावर मुख्यमंत्री सहायता कक्षातून ही मदत तातडीने वर्ग करावी आणि जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलावा अशी विनंती आमदार थाेरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केली हाेती.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात यांची मागणी तात्काळ मान्य केली. वारकऱ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल, असे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.