खासदार शरदचंद्रजी पवार यांनी कायम कार्यकर्त्यांना बळ दिले – आ. बाळासाहेब थाेरात
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवीदृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला केला असून त्यांनी दिलेला राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले आहे.
आश्वी बु येथे रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर मा. आ डॉ सुधीर तांबे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सत्यजित तांबे, प्रकाश गजभिये, रावसाहेब मस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण पा. कडू, सौ दुर्गाताई तांबे, रणजीत सिंह देशमुख, बाजीराव खेमनर, अॅड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, उत्कर्षाताई रुपवते, गणपतराव सांगळे, सुधीर मस्के, अशोकराव गायकवाड, सौ वैशालीताई गायकवाड, सरपंच नामदेव शिंदे, विजय हिंगे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाणी व वीज हे खाते होते. त्यातून त्यांनी धरणांची निर्मिती करण्यासह पाण्यापासून वीजनिर्मिती करून भारताला एक नवी दृष्टी दिली. याचबरोबर कार्यकर्त्यांचा मोठा संच निर्माण करताना उपेक्षित वर्गामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. हाच वारसा घेऊन बाळासाहेब गायकवाड यांनी काम केले असून अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी जन माणसांची कामे केली आहेत . सातत्याने लोकांमध्ये राहण्याबरोबर कधीही कायद्याचा गैरवापर केला नाही. तर आ थोरात म्हणाले की, ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांनी कायम कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. राज्यभरातील हाडाचे कार्यकर्ते शोधून त्यांना संधी दिली आहे .सर्वसामान्यांचा सन्मान करणे हे त्यांचे वैशिष्ट्य असून कृषी मंत्री पदाच्या काळात सहा वर्ष पवार साहेबांबरोबर काम करताना राज्याचे विक्रमी कृषी उत्पन्न केले. राज्यातील प्रत्येक विभागाची खडानखडा माहिती असलेले नेतृत्व खा. शरदचंद्रजी पवार असून त्यांनी आज अश्वितील सर्वसामान्य कार्यकर्त्याचा गौरव केला आहे. बाळासाहेब गायकवाड यांनी कायम पुरोगामी विचार जपला असून समाजात तेढ निर्माण होऊ दिली नाही. चांगले काम केल्यामुळे या परिसरामध्ये खोट्या केसेस दाखल करण्याचे सत्र सुरू झाले असून अशा संकट काळात बाळासाहेब गायकवाड हा नेहमी सत्यतेच्या बाजूने उभे राहिले असल्याचेही ते म्हणाले.
तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की पवार साहेबांनी देशभरात जमवलेली कार्यकर्त्यांची फळी हीच मोठी संपत्ती आहे.