अंगावर आले तर शिंगावर घेऊ – भुजबळ

आता शांत बसाल तर अस्तित्व संपवाल – भुजबळ


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संधी मिळाली म्हणून त्यांनी देशासाठी राज्यघटना लिहिली. आज या आरक्षणामुळे ओबीसी समाजाला कुठेतरी ताठ मानेने जगता येत आहे. परंतू त्यावर आता घाव घातला जात असतांना अनेक मराठा, ओबीसी नेते गप्प आहे. मी बोलतो तर माझेच ओबीसी नेते सुद्धा माझ्यावर टिका करतात. आज संकटाची घडी असतांना तुम्ही जर शांत बसाल तर आपले अस्तित्व गमवाल. त्यामुळे या लढाईसाठी तयार राहिले पाहिजे. असे आवाहन यावेळी भुजबळ यांनी ओबीसी समाजाला केले.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले गेले तर आपला समाज शिक्षण, नोकरी, राजकीय सत्तेपासून बेदखल होईल. आपले अस्तित्व धोक्यात येईल. या समाजाला पुन्हा एकदा विषमता, दारिद्र्याच्या खायीत जावे लागेल. माराठा समाजाशी आमचे वैमनस्य किंवा दुश्मनी नाही. त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु ओबीसीमध्ये अतिक्रमण केल्यास आम्ही शांत बसणार नाही, अंगावर आला तर शिंगावर घेऊ. आम्ही सुद्धा शिवरायांचे मावळे आहोत असा इशारा ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
काल बुधवारी (दि.03) संगमनेर शहरातील जय जवान चौकात सकल ओबीसी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री भुजबळ म्हणाले, मराठा समाजाचे 58 मोर्चे शांततेत निघाले. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, याला माझा सुद्धा पाठिंबा होता. मी सुद्धा 31 वर्ष शरद पवार वआता अजित पवार यांच्या सोबत काम करतोय. माझ्या मनात राग किंवा विष असते तर कधीच त्यांच्याबरोबर काम केले नसते. त्यांच्याबरोबर राहून अनेक मराठा आमदार, खासदार यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले असे छगन भुजबळ म्हणाले. मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. मात्र सुप्रीम कोर्टात अडकले. त्या त्रुटी दूर करून आरक्षण द्या. तुमचे ताट वेगळे आणि आमचे ताट वेगळं चालू द्या. आम्ही आजही मराठा समाजाला मोठा भाऊ समजतो. परंतु जालन्याचे नवीन नेते प्रत्येक वेळी नविन मागणी करत आहे. आमचा विरोध फक्त ओबीसीतून आरक्षण देण्याचा आहे. हे भलते सलते लाड महाराष्ट्रात चालणार नाही. हा ओबीसी कुठल्याही दादागिरीला घाबरत नाही. नुकतेच अधिवेशन झाले. ओबीसींचे आमदार सुध्दा बोलायला तयार नाही आणि जे बोलतात ते माझ्याच विरुद्ध बोलत आहेत. मराठा समाजाला भरपूर काही मिळाले आहे. आज अनेक संस्था त्यांच्याकडे आहेत. आतापर्यंत 80 टक्के मुख्यमंत्री तुमचे झालेत. आम्ही तुम्हाला मोठ भाऊ मानतो. मात्र, आम्हालाच संपवायला लागले तर हे संपणार नाही, हे लक्षात ठेवा. असेही मंत्री भुजबळ म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख