जयहिंद लोकचळवळीच्या पुरस्कारामुळे शेतकर्‍यांना मिळणार नवी उर्जा – ना. मुंडे

मुंबई येथे राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार संपन्न

संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रगतशील शेतकरी संदीप गवराम गुंजाळ यांना सपत्नीक जयहिंद लोकचळवळीच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. यावेळी आ. सत्यजीत तांबे, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, रमेश गुंजाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नियोजन, कष्ट, आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून संदिप गुंजाळ यांनी शेतीत केलेल्या अभिनव प्रयोगाला हा पुरस्कार म्हणजे मिळालेली एक उर्जा आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – निरोगी समाज निर्मिती बरोबर शिक्षण, कृषी आरोग्य या क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करणार्‍या जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून राज्यभरातील तरुण शेतकर्‍यांना कृषी व्यवसायासाठी दिले जाणारे प्रोत्साहन हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी काढले आहे. तर जयहिंद लोकचळवळीला आता ग्लोबल स्वरूप आले असल्याचे प्रतिपादन जयहिंदचे मार्गदर्शक विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे जयहिंद लोकचळवळीच्या वतीने चौथ्या युवा शेतकरी पुरस्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा. कृषी व महसूल तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक मा. आ. डॉ. सुधीर तांबे, युवा आ. सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. अभयसिंह जोंधळे उपस्थित होते.


यावेळी बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, काँग्रेस नेते आ. थोरात यांनी सहा वर्ष अत्यंत यशस्वीपणे कृषी मंत्री पद सांभाळले असून त्यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे. कृषी विभाग हा खर्‍या अर्थाने राज्याला पुढे नेणार असून आगामी काळात शेतकर्‍यांनी आपली उत्पादन क्षमता वाढवावी .याचबरोबर या उत्पादन वाढीतील 25% खर्च कमी करण्यासाठी राज्याचा कृषी विभाग प्रयत्न करणार असून यामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती निर्माण होणार आहे. शेती परवडत नाही. परंतु आपण परंपरा म्हणून शेती करत असतो. मात्र शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय म्हणून स्वीकारला तर तरुण नक्कीच यशस्वी होतील.
तर आ.थोरात म्हणाले की, जयहिंद लोकचळवळ ही सकारात्मक विचार घेऊन समाजात परिवर्तन घडवण्यासाठी काम करत आहे. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आले असताना भारताची अर्थव्यवस्था मात्र टिकून राहते. याचे कारण शेती व्यवसाय आहे. कारण आपली अर्थव्यवस्था ही शेतीशी निगडित आहे. शेती हा आपण धर्म म्हणून पाहतो. आपल्या महसूल मंत्री पदाच्या काळात ही पिक पाहणी हा उपक्रम पीक नोंदणीसाठी राबविला गेला असून तो देशासाठी दिशादर्शक ठरणारा झाला आहे. जयहिंदने सातत्याने विविध क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन दिले असून ही लोकचळवळ आता ग्लोबल ठरत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर मा आमदार डॉ तांबे म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जय हिंद ची चौथी ग्लोबल कॉन्फरन्स मुंबईत होत असून या निमित्ताने विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या दिगज्यांचा संवाद तरुणांशी होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख