कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा

प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधा – शेतकरी हवालदिल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – काही दिवसांपूर्वी राज्यात कांदा पिकाचा प्रश्‍न प्रचंड गंभीर बनला होता. कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. या शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळावा म्हणून राज्यशासनाच्या वतीने या शेतकर्‍यांना अनुदान जाहीर केले होते. हे अनुदान मिळविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत अर्ज दाखल करत आहेत. मात्र याठिकाणी या शेतकर्‍यांना तासंतास उन्हातान्हात उभे रहावे लागत आहे. बाजार समितीकडून मिळणार्‍या अपुर्‍या सुविधेमुळे शेतकरी हवालदिल होत आहे. बाजार समिती निवडणूकीमुळे याकडे कुणाचे लक्ष नाही.


राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना 350 रूपये प्रमाणे अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान मिळविण्यासाठी काही नियम अटी देखील टाकण्यात आल्या आहेत. या नियम अटींची पुर्तता करून हे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर या ठिकाणी अर्ज दाखल करत आहेत. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपूर्ण कर्मचारी वर्गामुळे कांदा अनुदान फॉर्म जमा करण्यासाठी केवळ एकच खिडकी ठेवण्यात आली आहे. शेतकरी वर्गाला सकाळी आठ वाजेपासूनच या ठिकाणी रांगेत उभे राहावे लागत आहे. या अर्जात किरकोळ चुका झाल्या तरी त्यांना अनुदानाला मुकावे लागणार आहे. अगोदर शेतकरी वर्ग अस्मानी संकटामुळे अडचणीत असताना आता रांगेमध्ये उभे राहून आणखी त्रस्त होत आहे. तासंतास रांगेत उभे राहून काम होण्याची शाश्‍वती नाही. त्यामुळे या ठिकाणी मनुष्यबळ वाढवून शेतकर्‍यांना बाजार समितीच्या वतीने सहकार्य करावे अशी अपेक्षा शेतकरी करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख