संगमनेर बाजार समितीसाठी उत्साहात मतदान

आजी-माजी महसूल मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मतदानाला आज शहरातील जनता नगर येथील जिजामाता प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. आ. बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेल्या या बाजार समिती निवडणुकीत आजी माजी महसूल मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
एकूण 3 हजार 623 मतदार असलेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी दुपारपर्यंत 65 टक्के मतदान झाले. दुसर्‍या दिवशी सकाळी शनिवार दि. 29 रोजी सकाळी 9 वाजता मतमोजणी होणार आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व राहिले आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांचा मोठा विश्‍वास असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठी प्रगती केली आहे. आत्तापर्यंत बाजार समितीची निवडणूक बिनविरोध किंवा थोरात यांच्याच अधिपत्याखाली राहिली आहे. मात्र यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या निवडणूकीत लक्ष घातल्याने व सध्या त्यांच्याकडे सत्ता व मंत्रिपद असल्याने या निवडणुकीत त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडणूकीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटातील उमेदवार रिंगणात उतरले असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याची चर्चा आहे.


यामध्ये सोसायटी मतदार संघातील 1669, ग्रामपंचायत मतदार संघातील 1404, व्यापारी मतदार संघातील 403 व हमाल मापाडी मतदारसंघातील 147,
असे एकूण 3 हजार 623 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार होते. सकाळपासून मतदार केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. दुपारी उन्हातही मतदारांनी रांगेत उभे राहून मतदान केले. शेतकरी विकास मंडळ व जनसेवा विकास मंडळ या दोन मंडळात ही चुरशीची निवडणूक होत आहे.
यावेळी प्रथमच ना. विखे यांनी संगमनेरात तर आ. बाळासाहेब थोरात यांनी राहता तालुक्यात लक्ष घातल्याने एकहाती सत्ता असलेल्या या नेत्यांच्या बालेकिल्यात विरोधकांचा शिरकाव होणार का याकडे दोन्ही तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान मतदान शांततेत पार पाडण्यासाठी यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान दुसर्‍या दिवशी म्हणजेच शनिवार (दि.29) सकाळी 9 वाजता याच शाळेत मतमोजणी सुरू होणार आहे. या निकालाचे पुढील राजकारणावर परिणाम होणार असल्याने सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती

झालेले मतदान 4 pm

1)सोसायटी एकूण मतदान 1677 झालेले 1621 97%

2) ग्रामपंचायत 1387 झालेले मतदान 1367 99%

3 ) हमाल मापाडी 147 झालेले मतदान 143 100%

4) व्यापारी 403 झालेले मतदान 370= 92%

एकूण मतदान-3614
झालेले मतदान- 3505
97%

संगमनेर बाजार समितीच्या 18 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहे. तर 3663 मतदार आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी अशी महाआघाडी आहे. संगमनेरात पहिल्यांदाच बाजार समिती निवडणूकीत काँग्रेसने शिवसनेला ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोबत घेत महाआघाडीची सुरूवात केली. प्रथमच या निवडणूकीत स्थानिक शिवसेना (उबाठा) मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव घोलप, शहर प्रमुख अमर कतारी व इतर पदाधिकार्‍यांनी या निवडणूकीत महाआघाडीचा जोरदार प्रचार केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी अलिप्त राहिली. भविष्यात शिवसेना आणि काँग्रेस तालुक्यात सोबतच लढणार असे संकेत या निवडणूकीतून मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख